Spread the love

 

पुणे, : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १७ लाख ७१ हजार ८०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे.

गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरीता असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर तसेच हातभट्टी दारूच्या वाहतुकीवर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये दौंड विधानसभा मतदारसंघात दोन चारचाकी वाहने हातभट्टी दारूसह जप्त करून दोघांना अटक केली. तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघात वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर पथकाने परराज्यातील (गोवा राज्य निर्मित व फक्त तेथेच विक्रीसाठी असलेल्या) विदेशी मद्याची वाहतूक व विक्री करत असताना एका चारचाकी वाहनासह दोन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण तीन चारचाकी वाहनासह एकूण १७ लाख ७१ हजार ८०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, मनोज होलम सागर साबळे सहभागी होते.