भारतातील सर्वात मोठं युथ नेटवर्क पुण्यात आणत आहे युवा संस्कृती, सर्जनशीलता आणि महत्वाकांक्षेचा उत्सव 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी
पुणे : – अंडर २५, भारतातील आघाडीचं युवा नेटवर्क, भारतातील अग्रणी युवा-केंद्रित इव्हेंट प्रथमच पुण्यात घेऊन येत आहे. पुण्यातील पहिले अंडर २५ समिट, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी रॉयल पाम्स येथे होणार असून, युवा संस्कृती, सर्जनशीलता आणि महत्वाकांक्षेचं संमेलन ठरणार आहे. तरुणांना व्यक्तिगत, व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या वाढण्यासाठी आवश्यक साधने आणि संधी देण्यासाठी समर्पित असलेला हा इव्हेंट, भारतातील काही उत्तम निर्माते, कलाकार आणि विचारवंतांना एकत्र आणणार आहे, ज्यामुळे विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांना शिकता येईल, जोडता येईल आणि प्रेरणा घेता येईल.
अंडर २५ ने विद्यार्थ्यांसाठी आणि तरुण व्यावसायिकांसाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून नाव कमावलं आहे. संस्थेचा अॅप आणि कॉलेज प्रोग्राम्स भारतभरातील तरुणांना महत्त्वपूर्ण संधी पुरवतात, ज्यामुळे त्यांना ओळख मिळते आणि यशस्वी करिअरकडे मार्गदर्शन करता येतं. पुण्यातील अंडर २५ समिट हा या मिशनचा विस्तार आहे, जिथे महत्वाकांक्षी व्यक्ती एकत्र येऊन नेटवर्क करू शकतात, आयडियाज शेअर करू शकतात आणि त्यांच्या क्षमता जाणून घेऊ शकतात.
“अंडर २५ समिट चा जन्म बंगळुरूमध्ये झाला आणि यंदा प्रथमच आम्ही तो पुण्यात घेऊन येत आहोत,” असे कलेक्टिव आर्टिस्ट्स नेटवर्कचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ विजय सुब्रमण्यम यांनी सांगितले. “हा इव्हेंट युवा संस्कृती, सर्जनशीलता आणि महत्वाकांक्षेचं संमेलन आहे आणि यंदाच्या शिखर संमेलनात त्याचं सर्वोत्तम प्रदर्शन होईल. मला विश्वास आहे की पुणे या ऊर्जा अनुभवण्यासाठी तयार आहे.”
एक अपूर्व अनुभव देणार्या या इव्हेंटमध्ये दोन दिवसांच्या दरम्यान विशेष प्रदर्शनं आणि वक्त्यांचा ताफा उपस्थितांना ऊर्जा देत ठेवेल.
उपस्थितांना रितविज आणि करण कंचन यांचा लाईव्ह शो अनुभवता येईल, ज्यात इलेक्ट्रॉनिक म्युझिक आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा सुंदर मिलाफ आहे, तसेच केआरएसएनए (KRSNA) चं दमदार हिप-हॉप सेशन पाहता येईल, जो भारतीय रॅप जगतातील एक प्रमुख नाव आहे.
समिटमध्ये अभिनेता इम्रान खान, क्रिएटर आणि इन्फ्लुएंसर रिबेल किड, कॉमेडी जोडी फंचो, अभिनेत्री पारुल गुलाटी आणि लोकप्रिय मराठी क्रिएटर ऑरेंज ज्यूस गँग सारखे विविध क्षेत्रातील प्रभावशाली वक्ते उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये इंटरेक्टिव्ह चर्चासत्रं, लाईव्ह परफॉर्मन्सेस आणि इंटरेस्टिंग वर्कशॉप्सचा अनुभव घेता येईल, ज्यामुळे त्यांना आदर्शांकडून शिकता येईल आणि समान विचारसरणी असलेल्या लोकांशी नेटवर्क करता येईल. एक्सपेरियन्स झोन्स, स्किल-बेस्ड चॅलेंजेस आणि विविध गोष्टींचा अनुभव घेता येईल, जे त्यांच्या सर्जनशीलतेला प्रेरणा देईल.
“हे केवळ एक इव्हेंट नाही – हे तरुणांना एकत्र येण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी आणि मजा करण्याची संधी आहे,” असं अंडर २५ चे सीईओ जील गांधी यांनी सांगितलं. “आम्ही अंडर २५ च्या भावना प्रतिबिंबित करणारे वक्ते आणि परफॉर्मर्स यांची उत्तम लाईनअप तयार केली आहे आणि आम्हाला पुण्याच्या उर्जेची अनुभूती घ्यायला उत्सुक आहोत.”
अंडर २५ विषयी तरुणांना सशक्त बनवण्याच्या उद्देशाने अंडर २५ भारतातील तरुण आणि महत्वाकांक्षी लोकांच्या जीवनाला नवा अर्थ देत आहे. हे व्यासपीठ संपूर्ण देशभरातील व्यक्तींना मोठी स्वप्न पाहायला, कृती करायला आणि अर्थपूर्ण जीवन जगायला प्रोत्साहित करतं – आणि ते करताना मजाही येते. अॅप, कॉलेज प्रोग्राम्स आणि इव्हेंट्सच्या माध्यमातून, अंडर २५ आजच्या युवांना त्यांच्यासाठी अर्थपूर्ण प्रवास घडवत आहे.
कार्यक्रम तपशील: तारीख: ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर
वेळ: सकाळी १०:०० पासून पुढे
ठिकाण: रॉयल पाम्स, कोरेगाव पार्क पुणे
बुकिंग: बुकिंगसाठी BookMyShow – https://in.bookmyshow.com/events/the-under-25-summit/ET00412000