पुणे (दि.२५) साने गुरुजी जयंती निमित्त साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक सभागृह म्हात्रे तलाव खारीगाव ठाणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विद्यावाचस्पती डॉ.मिलिंदस्वामी महाराज भोसुरे,सानेगुरुजी मित्रमंडळाचे अध्यक्ष शिरसाठ सर,परिवारातील महादेव नाईक,श्री डोंगरे, सर्जेराव नऱ्हे,दिलीप शिवले,दत्ता यंदे,समाजवादी ज्येष्ठ समाजसेवक दशरथ पाटील,नगरसेवक उमेश पाटील आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी उपस्थित होते.या प्रसंगी मार्गदर्शन करतांना विद्यावाचस्पती डॉ.मिलिंदस्वामी महाराज भोसुरे यांनी साने गुरुजींनी “खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे” हीच शिकवण कायम सर्वांना दिली, यापासून आजही सर्वांना प्रेरणा मिळते असे प्रतिपादन केले.