Spread the love

हा विजय महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ :
संदीप खर्डेकर

महायुतीतील सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी, नेते, यांनी एकसंघपणे काम केल्यामुळेच पुणे शहरात आठ पैकी सात जागांवर विजय मिळवता आला असे महायुतीचे समन्वयक आणि भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते अगदी बूथ लेव्हल पर्यंत एकत्रित काम करत होते वा संयुक्तपणे प्रचार यंत्रणा राबवत होते. कार्यकर्त्यांची वज्रमूठ आणि मतदारांना भावलेले प्रचारातील मुद्दे हेच ह्या विजयाचे – यशाचे गमक आहे असेही खर्डेकर म्हणाले. ह्या लढ्यात आम्ही वडगाव शेरी ची जागा गमावली ह्याचे दुःख आहे च पण ह्या पराभवाच्या कारणांचाही शोध नक्की घेऊ असेही संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतानाच आम्ही “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” ह्या पंतप्रधान “नरेंद्र मोदी” यांच्या संकल्पानुसार पुण्याला विकासाच्या नव्या क्षितिजावर घेऊन जाऊ असेही संदीप खर्डेकर म्हणाले. 🙏🤝