
पुणे दि.१- ” जगात कुठलेही तत्त्वज्ञान नष्ट करता येत नाही अण्णाभाऊ साठे जागतिक विचाराचे समाज सत्तावादी विचाराचे लोकशाहीर होते. आपल्या संविधानातून समाजकार आणि धर्म निरपेक्षता शब्द वगळण्याचे कारस्थान जनता खपवून घेणार नाही असे मत जेष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांनी व्यक्त केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित रतनलाल सोनग्रा लिखित अण्णाभाऊंच्या सहवासात या पुस्तकाचे प्रकाशन माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या हस्ते व बहुजन समाज पार्टीचे महासचिव डॉ. हुलगेश चलवादी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यानगर येथे करण्यात आले. यावेळी सुशीला सोनग्रा , पी .आर .गायकवाड , क्रांतीकुमार दनाणे , निलेश अवचरे, भालचंद्र गव्हाणे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. चलवादी व जाधव यांच्या हस्ते आचार्य सोनग्रा यांचा महात्मा फुले पगडी , शाल व भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला .