Spread the love

बोपोडी सिग्नल चौकात न्यू बोपोडी सोशल कट्टा परिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पुणे – न्यू बोपोडी सोशल कट्टा परिवाराचे क्रियाशील सदस्य, उद्योजक व “मसाला चहा” या लोकप्रिय उपक्रमाचे संस्थापक तन्मय गवंडे यांचा वाढदिवस बोपोडी सिग्नल चौक येथे उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री सुरेश पवार यांनी शाल घालून, तर नितीन मरपाळे यांनी पंचशील देऊन तन्मय गवंडे यांचा सत्कार केला. त्यांना बी. एम. कांबळे, सुनील थोरात, तसेच सोशल कट्टाचे अध्यक्ष अंकुशराव साठे यांनी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे केक कापून उपस्थित सर्वांना स्नॅक्स व मिठाई वाटप करण्यात आली, यामुळे उपस्थितांचा आनंद द्विगुणित झाला.

कार्यक्रमास श्री विजय गायकवाड, संतोष दरे, रवी नायर, आशिष मोरे, अतुल गायकवाड, मुश्ताक शेख, राजू जाधव, मनीष साळुंखे, करीम तुर्क, लोरेन्स पिल्ले, मंगेश गायकवाड, दादा भोसले, सचिन कांबळे, राजेश धंगेकर, राहुल वाघमारे, सन्नी परमार, सुनील दोडके आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल न्यू बोपोडी सोशल कट्टा परिवाराने सर्वांचे आभार मानले.

— PM News