
हर्षवर्धन फाउंडेशन कडून भव्य आयोजन
पुणे :हर्षवर्धन फाऊंडेशन आणि एकता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा सेंटर जवळ एरंडवणे येथे दहीहंडी -२०२५ उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.आयोजक सनी निम्हण,हर्षवर्धन फाऊंडेशनच्या संस्थापिका स्नेहल सनी निम्हण आणि उत्सवअध्यक्ष शिवम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रंगला.या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.“गोविंदा आला रे”च्या तालावर तरुणाई न्हाऊन गेली. सहा थरांची मानवी रचना करून गोविंदांनी थरारक क्षणात दहीहंडी फोडली आणि परिसरात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष उसळला.या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी ‘गोल्डन गाइज’ म्हणून ओळखले जाणारे सनी वाघचौरे, बंटी गुजर तसेच प्रिती सोनी, मराठी अभिनेत्री पूजा कातुर्डे, गौरी कुलकर्णी, विदिशा म्हसकर,मराठी सिने अभिनेता अक्षय टंकसाळ यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.एरंडवणे ,कर्वेनगर मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून हा पारंपरिक उत्सव अविस्मरणीय केला.दहीहंडी उत्सव आयोजनाचे मंडळाचे हे पहिलेच वर्ष होते.