“कामगार दिन, अक्षय्य तृतीया व संजीव अरोरा यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विंग्रो आठवडे बाजारातील महिलांना साड्या भेट

Spread the love

 

“क्रिएटिव्ह फाउंडेशन व म. ग.आचवल ट्रस्ट तर्फे तर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील संपन्न – संदीप खर्डेकर”.

कामगार दिन, अक्षय्य तृतीया व ग्लोबल ग्रूप चे संचालक संजीव अरोरा यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विंग्रो मार्केट संचालित शेतकरी आठवडे बाजारातील महिलांना साड्या भेट देण्यात आल्या. क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त व माजी नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर तसेच ऍड. प्राची बगाटे यांच्या हस्ते ही भेट प्रदान करण्यात आली.
विंग्रो मार्केट च्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक असा हा आठवडे बाजार सुरु करून सहा वर्ष झाली असून एरंडवणे भागात आता 3 ठिकाणी हा बाजार भरतो असे ह्या बाजाराच्या प्रवर्तक संयोजक मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.येथील महिला अतिशय कर्तव्यदक्ष असून त्या आलेल्या ग्राहकांना प्रामाणिकपणे योग्य दरात,उत्तम भाजीपाला उपलब्ध करून देतात, त्यामुळेच हे आठवडे बाजार नागरिकांच्या पसंतीस उतरले असून एरंडवणे, भुजबळ बाग, नवसह्याद्री येथील यशस्वी कार्यानंतर आता कर्वेनगर भागात ही याच्या शाखा सुरु करण्याचा मनोदय असल्याचेही सौ. मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.ह्या महिलांच्या कामाची दखल घेऊन आज त्यांना साड्या भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याचे सौ. खर्डेकर व ऍड. प्राची बगाटे म्हणाल्या.
ह्या उपक्रमसोबतच क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने ऑल आर्टिस्ट फाउंडेशन चे सभासद असलेल्या चार कलावंतांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया व एका कलावंताची लेझर शस्त्रक्रिया देखील संपन्न झाली. यासाठी कै. म. ग. उर्फ राजाभाऊ आचवल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे डॉ. अनिल परांजपे यांनी निम्मा व क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी निम्मा खर्चाचा भार उचलला. यापुढील काळात ही गरजू व्यक्तींची नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असून गरजूनी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या 9850999995 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे संदीप खर्डेकर यांनी कळविले आहे.
ग्लोबल ग्रुप चे संचालक संजीव अरोरा यांनी एक मे ह्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्याचा वापर विविध सामाजिक कार्यासाठी करणार असल्याचे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *