
खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कार्यरत असून, मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि **वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विक्रमसिंह कदम** यांच्या मार्गदर्शनाखाली एक **महत्त्वाची आणि धाडसी कारवाई** यशस्वीपणे पार पडली आहे.
खडकी पोलीस स्टेशन गु.र.नं. **98/2025**, भा.दं.वि. कलम **189(1), 189(2), 189(4), 191(1), 191(2), 191(3), 190, 324**, महाराष्ट्र पोलीस अधिनियम **कलम 37(1) सह 135**, **आर्म्स अॅक्ट 4(25)** व **क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम 7** अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील **पाहीजे आरोपी राजसिंग युवराजसिंग जुनी (वय 28 वर्षे, रा. पाटील इस्टेट, पुणे)** याला अटक करण्यात आली आहे.
सदर माहिती **पोलीस अंमलदार दिनेश भोये** यांना त्यांच्या **गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली**, की आरोपी **मुळा नदीच्या काठावर, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे** येथे बुलेट मोटारसायकलसह थांबलेला आहे. तत्काळ वरिष्ठांना माहिती देऊन, **पो.उ.नि. श्री. चौगले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी जावून कारवाई केली.**
घटनास्थळी एक इसम मोटारसायकल सह उभा दिसून आला. त्यास शिताफीने ताब्यात घेतल्यावर त्याचे नाव **राजसिंग युवराजसिंग जुनी** असल्याचे निष्पन्न झाले. मोटारसायकलची तपासणी केली असता **डाव्या बाजूस लपवून ठेवलेली लोंखंडी तलवार** मिळून आली.
चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले की, **तीन महिन्यांपूर्वी त्याच्या भावावर इराणी समाजातील व्यक्तींनी हल्ला केल्याने त्याने वादाच्या पार्श्वभूमीवर ती तलवार वापरून तोडफोड केली होती.** सदर गुन्ह्यात वापरण्यात वापरण्यात आलेले मोटारसायकल व हत्यार पंचासमक्ष जप्त करण्यात आले. आरोपीस **30 जुलै 2025 रोजी अटक करण्यात आली.
ही कारवाई पो.उ.नि. श्री. चौगले यांच्या पथकातील खालील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली त्यामध्ये शशी सपकाळ, प्रताप केदारी, शशांक डोंगरे, गालिब मुल्ला, सुधाकर राठोड , दिनेश भोये, अनिकेत भोसले, ऋषिकेश दिघे.