
खडकी पोलीसांची धडाकेबाज
पुणे : खडकी पोलीस ठाणे हद्दीत 2021 साली मे महिन्यामध्ये एक गंभीर स्वरुपाचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाबुराम भैय्याराम अग्रवाल, वय 60 वर्षे, व्यवसायाने किराणा व्यापारी, रा. भैय्याराम निवास, पुणे यांच्या विश्वासात राहून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने धूर्तपणे व्यवसायातील व वैयक्तिक व्यवहारांतून फसवणूक केली होती. त्यातील फिर्यादी हे नवनियुक्त पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे सो यांना भेटले होते. त्यांनी सदर गुन्ह्यच्या तपासाबाबत गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन करुन उघड करण्याची सक्त सुचना व मार्गदर्शन केले होते.
सदर आरोपी 2010 पासून फिर्यादी यांच्या किराणा व्यवसायात कामास होता. दीर्घ काळाची सेवा, सातत्य आणि घरगुती कामांत सहभाग यामुळे मालकाचा पूर्ण विश्वास बसलेला होता. ह्याच विश्वासाचा गैरफायदा घेत एके दिवशी मालकाने बँकेत भरण्यासाठी म्हणुन दिलेली एकुन 12,27,920/- रुपयांची रक्कम घेवून मालकाचीच गाडी घेवून पसार झाला. या प्रकाराची माहिती मिळताच खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवत वारंवार ठिकाणं बदलली. पोलिसांना दिशाभूल करणारे प्रकार करत तो चार वर्षे तीन महिने सतत फरार राहिला. दरम्यान, आरोपीच्या कुटुंबातील काही सदस्यांनीच उलट फिर्यादीविरुद्धच अपहरणाचा बनवटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे फिर्यादी यांना देखील मानसिक त्रास झाला होता. त्यामुळे मूळ तपासाला भ्रमित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र खडकी पोलिसांनी तपासाची दिशा न बदलता, शांतपणे, सातत्याने व योजनाबद्धरीत्या काम सुरूच ठेवले. सदर प्रकरणाचा तपास मा. दिलीप फुलपगारे सो, वपोनि खडकी, व दत्तात्रय बागवे सो पोनि गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्याकडे देण्यात आला त्यांचे टिमने उपलब्ध तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदार आणि अन्य स्त्रोतांचा कसून अभ्यास करून आरोपीचा तपशीलवार मागोवा घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पो.कॉ. अनिकेत भोसले यांची टेक्नीकल माहिती आणि सुधाकर रोठोड, गालीब मुल्ला, शशांक डोंगरे यांचे गोपणीय बातमीदार या आधारावर पथकाने मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर येथून आरोपी रावसाहेब शहराम कराळे (वय.52 रा.धामणगाव देवीचे ता. पाथर्डी
जिल्हा… अहिल्यानगर) यासंदर्भात ताब्यात घेतले आणि खडकी पोलीस ठाणे येतून अटक केली.
या कारवाईमुळे तब्बल चार वर्षे तीन महिने सुरु असलेल्या शोध मोहिमेला यश आले असून, खोट्या आरोपांनी निर्माण झालेल्या संभ्रमावरदेखील अखेर पूर्णविराम मिळाला आहे. फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात येऊन तपास पथकाचे मनःपूर्वक आभार मानले असून, स्थानिक नागरिकांकडूनही खडकी पोलिसांच्या या यशस्वी कार्यवाहीचे विशेष कौतुक होत आहे.
सदरच्या कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार मा. पोलीस सहआयुक्त श्री रंजानकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोजकुमार पाटील मा. पोलीस उपआयुक्त सो परिंमंडळ 4 पुणे शहर श्री सोमय मुंडे सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग मा. विठ्ठल दबडे सो यांचे मार्गदर्शनाखाली श्री दिलीप फुलपगारे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. दत्तात्रय बागवे सो, पोलीस निरीक्षक गुन्हे, तपास पथक प्रमुख दिग्विजय चौगले, पोलीस हवलदार शशीकांत सपकाळ, रुषीकेश दिघे, दिनेश भोये, शशांक डोंगरे, प्रताप केदारी, प्रविण गव्हाणे, शिवराज खेड यांनी केली आहे.