
कोथरुड, बाणेर-बालेवाडी, पाषाण सूस मधील विविध सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवा यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने कोथरुडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे कोथरुडकरांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
गणेशोत्सव महाराष्ट्रातील महत्वाचा आणि प्रत्येकाच्या आवडत्या सणांपैकी एक सण म्हणून ओळखला जातो.गणेश चतुर्थीला गणपतीचे आगमन झाल्यानंतर, घराघरात भजन किर्तन सारखे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोथरुड हे पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीचे माहेरघर असल्याने, गणेशोत्सव अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवा; यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने कोथरुडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याअंतर्गत कोथरुड मतदारसंघातील कोथरुड, बाणेर-बालेवाडी, पाषाण सूस मधील विविध सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विनोदी एकपात्री प्रयोग, सुगम संगीत, भावगीत, भक्तिगीते, पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा ढोल-ताशा पथकांचे वादन आदींचा समावेश असून, यामुळे कोथरुडकरांना सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद मिळणार आहे.
या महोत्सवाबद्दल ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की,गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवांपैकी एक असून; या उत्सवाच्या निमित्ताने नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने इतरत्र स्थायिक झालेले आप्त मंडळी एकत्रित येत असतात. त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी गेल्या वर्षीपासून कोथरुड मतदारसंघात गणेशोत्सव काळात सोसायटी भागात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
गेल्या वर्षी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला. अनेक अहवाल-वृद्ध या सोहळ्यात अतिशय उत्सफूर्तपणे सहभागी झाले होते. यंदाही कोथरुडकरांसाठी अशाच पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, कोथरुडकरांचा आनंद यामुळे नक्कीच द्विगुणित होईल, असा विश्वास ना. पाटील यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.