कोथरूड मधील मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेत; घरोघरी संपर्काद्वारे मतदारांना आवाहन केले.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे स्त्रीचा भक्कम आधार असतो. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा यांना त्यांच्या पत्नी आणि व्यवसायाने कॉस्ट ऑडिटर असलेल्या अंजली पाटील यांची वेळोवेळी साथ मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली आहे. नागरिकांमधूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांनीही निवडणूक प्रचारात सहभागी होऊन; कोथरूड मधील अनेकांच्या घरोघरी भेटी घेत आहेत.
यामध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सुनिती जोशी, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ. वासंती पटवर्धन आणि भुपाल पटवर्धन, प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ माया तुळपुळे, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे आणि मधुमिता बर्वे यांच्या भेटी घेऊन मतदानासाठी आवाहन केले.
यावेळी माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, उद्योजिका स्मिता पाटील ह्या देखील उपस्थित होत्या.