Spread the love

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदासंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या प्रचाराची सांगता आज भव्य बाईक रॅली ने कऱण्यात आली. नागरिकांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शिवाजीनगरच्या विकासासाठी मला मतदार संधी देतील असा विश्वास मनिष आनंद यांनी रॅली नंतर आयोजित पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेत बोलताना मनिष आनंद म्हणाले, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अपुरी ड्रेनेज व्यवस्था यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय शिक्षण, रोजगार आणि खेळाच्या मैदानाची गरज, पर्यावरण रक्षण यावरही शिवाजीनगर मध्ये काम करण्याची गरज आणि हे परिवर्तना शिवाय शक्य नाही, हे मतदार जाणून आहेत यामुळे प्रचारा दरम्यान माझ्याशी अनेक संस्था, संघटना जोडल्या गेल्या, कारण त्यांना माझे व्हीजन आवडले. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाचे रूपांतर मतात झालेले दिसेल असा विश्वास आनंद यांनी व्यक्त केला.

निवडून आलात तर कोणत्या पक्षा सोबत जाणार या प्रश्नाच्या उत्तरावर आनंद म्हणाले, मला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने माझे काम आणि व्हीजन बघून बिनशर्त पाठिंबा दिला आहे, छत्रपती संभाजीराजे यांनी कोणत्याही अटी – शर्ती माझ्यापुढे ठेवलेल्या नाहीत. मतदारसंघाचे हित आणि माझ्या माणसांचे प्रश्न कोण सोडवेल याचा विचार करून मी निर्णय घेईल असेही आनंद यांनी सांगितले.