*क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे रकतदान तपासणी यंत्र भेट – यापुढेही सर्वोतोपरी मदत करणार*
मशाल संस्थेच्या माध्यमातून वस्ती विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे देवदूतच आहेत असे गौरवोदगार क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी काढले.
आज मशाल संस्थेच्या आरती भोर आणि कविता तडवी यांना ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी साठी सात (7) रक्तदाब तपासणी यंत्र भेट देताना कर्तव्यपूर्तीचे समाधान आहेच पण भविष्यात देखील त्यांना अधिकाधिक सहाय्य करणार असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.यावेळी ट्रस्ट चे सदस्य सारंग राडकर, सोशल वर्कर आणि मशाल च्या कम्युनिटी ऑफिसर आरती भोर, कविता तडवी, वंशिका ट्रस्ट चे विशाल सातपुते इ मान्यवर उपस्थित होते.
मशाल संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करणाऱ्या व त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देणाऱ्या आरती भोर व कविता तडवी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्यात हाडांचा ठिसूळपणा, रक्तदाब, मधुमेह इ आरोग्याच्या समस्या वाढल्या असून परिस्थिती मुळे ते दुखणं अंगावर काढतात असे सांगितले.त्यावर संदीप खर्डेकर यांनी “ग्लोबल ग्रूप, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग, नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट” या सह अनेक दानशूर अश्या कार्याला मदत करत असतात त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला जी मदत लागेल ती उपलब्ध करेन असे वचन दिले.
*संदीप खर्डेकर*
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995