Spread the love
बुल्स् इलेव्हन, डॉल्फिन इलेव्हन, स्कॉर्पियन्स् इलेव्हन, टायगर्स इलेव्हन संघांची अंतिम फेरीत धडक !!

पुणे, २ डिसेंबरः डेक्कन इलेव्हन क्लबच्यावतीने आयोजित दुसर्‍या ‘डेक्कन इलेव्हन प्रिमीअर लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या ८, १२ आणि १५ वर्षाखालील या तीनही गटामध्ये बुल्स् इलेव्हन संघांनी अंतिम फेरी गाठली असून बुल्स् संघाला तिहेरी मुकूटाची संधी आहे. याशिवाय डॉल्फिन इलेव्हन (८ वयोगट), स्कॉर्पियन्स् इलेव्हन (१२ वयोगट) आणि टायगर्स इलेव्हन (१५ वयोगट) यांनीही आपापल्या गटातून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

कर्वेनगर येथील सेवासदन शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत १२ वर्षाखालील गटामध्ये श्रीनिवास नारवेकर याने केलेल्या गोलामुळे स्कॉर्पियन्स् इलेव्हनने डॉल्फिन्स् इलेव्हनचा १-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसर्‍या सामन्यात बुल्स् इलेव्हन आणि टायगर्स यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. बुल्स्कडून समर बोरगांवकर याने तर, टायगर्स इलेव्हनकडून अनय इंगळहळलीकर याने गोल नोंदविले.

१५ वर्षाखालील गटामध्ये विहान हार्डीकर याने नोंदवलेल्या गोलामुळे बुल्स् इलेव्हनने डॉल्फिन्स् इलेव्हनचा १-० असा पराभव केला. डॉल्फिन्स् इलेव्हनने या पराभवनंतरही सरस गुणांच्या जोरावर अंतिम फेरी गाठली आहे. ८ वर्षाखालील गटातील दोनही सामने बरोबरीत सुटले. डॉल्फिन्स् इलेव्हन आणि बुल्स् इलेव्हन यांच्यामधील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. टायगर्स इलेव्हन आणि डॉल्फिन्स् इलेव्हन यांच्यामधील सामना २-२ असा बरोबरीत सुटला. टायगर्स इलेव्हन आणि बुल्स् इलेव्हन यांनी सरस गुणांसह स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

गटसाखळी फेरीः १२ वर्षाखालील गटः
स्कॉर्पियन्स् इलेव्हनः १ (श्रीनिवास नारवेकर १८ मि.) वि.वि. डॉल्फिन्स् इलेव्हनः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः कार्तिक हिंगणे (डॉल्फिन्स् इलेव्हन);
रायनोज् इलेव्हनः १ (वज्रमानस अभयवीर ९ मि.) वि.वि. वुल्व्हज् इलेव्हनः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः वज्रमानस अभयवीर;
बुल्स् इलेव्हनः १ (समर बोरगांवकर ९ मि.) बरोबरी वि. टायगर्स इलेव्हनः १ (अनय इंगळहळलीकर १५ मि.); सर्वोत्कृष्ट खेळाडूः अनय इंगळहळलीकर;

१५ वर्षाखालील गटः
बुल्स् इलेव्हनः १ (विहान हार्डीकर १२ मि.) वि.वि. डॉल्फिन्स् इलेव्हनः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः विहान हार्डीकर;
टायगर्स इलेव्हनः ० बरोबरी वि. स्कॉर्पियन्स् इलेव्हनः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः अश्विन आगाशे (स्कॉर्पियन्स् इलेव्हन);

८ वर्षाखालील गटः
डॉल्फिन्स् इलेव्हनः १ (लव साबळे ७ मि.) बरोबरी वि. बुल्स् इलेव्हनः १ (केहान गोचायत १८ मि.); सर्वोत्कृष्ट खेळाडूः लव साबळे;
टायगर्स इलेव्हनः २ (अरोही पळसुळे ९ मि., नील फिरोदीया १७ मि.) बरोबरी वि. डॉल्फिन्स् इलेव्हनः २ (स्वयंगोल १२ मि., आरूष कासट २० मि.); सर्वोत्कृष्ट खेळाडूः नील फिरोदीया.