नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हक्काचे केंद्र -ना. चंद्रकांतदादा पाटील

Spread the love

पाषाण-सुतारवाडीतील नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र असून, कोथरुड मतदारसंघातील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ पोहोचवण्याची भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. कोथरुड मतदारसंघातील पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांसाठी नवीन जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण ना. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजप उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, उत्तरचे माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र आहे. मतदारसंघातील विविध जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या. त्यामुळे या जनसंपर्क कार्यालयाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचे कार्ड प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *