नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Spread the love

 

*विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन*

*ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाचा आदर्श सर्वांनी घ्यावा!- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ*

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. ना. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, शुभारंभ लॉन्स येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, अबाल-ज्येष्ठांपासून अनेकांनी ना. पाटील यांना प्रत्यक्ष भेटून, दुरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

वाढदिवस साधेपणाने साजरा करतानाच विविध समाजोपयोगी उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून विविध ठिकाणी आरोग्य आणि रक्तदान शिबीर, वृक्षारोपण अशा अनेकविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले. त्यासोबतच वाढदिवसानिमित्त हार-तुरे नको सामाजिक उपक्रमांसाठी निधी संकलनात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी निधी संकलनात हातभार लावला.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आ. शंकरभाऊ जगताप, हेमंत रासने, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे, नेत्या रेश्मा सय्यद, शिवसेना नेते नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, रुपालीताई ठोंबरे पाटील, समीर चांदेरे, अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, दत्ताभाऊ सागरे, दीपक मानकर, ॲड. मंदार जोशी, पराग ठाकूर, खरवडे देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, पुणे शहर पोलीस मित्र संघटना, बघतोय रिक्षावाला संघटना, पतितपावन संघटना, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चंद्रकांतदादा पाटील यांना शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.

यावेळी शुभेच्छा देताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना दादांचा संवेदनशील माणूस म्हणून सहा वर्षे जवळून अनुभवतोय. समाजातील अत्यंत दुर्लक्षित घटकाला न्याय देताना; समाजातील उपेक्षिताचे दु:ख हे आपलं दुःख मानून ते सदैव काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या कामाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. यातून समाजातील दु:खच संपेल, असं माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *