Spread the love

पुणे,दि. १३: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या अबेदा इनामदार ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे येथे आयोजित दुस-या टप्प्यातील प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक भिम सिंग यांनी भेट दिली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुनंदा भोसले, मतदान व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी बाळकृष्ण वाटेकर, सेक्टर ऑफिसर्स, पर्यवेक्षक उपस्थित होते.

दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रावरील प्रत्येकाची भूमिका व जबाबदारी याबाबत श्री. सिंग यांनी मार्गदर्शन केले. मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी यांना करावयाच्या कामाबाबत माहिती करुन देण्यात आली. सर्व प्रशिक्षणार्थींना मतदानाच्या पूर्व संध्येला मतदान केंद्राची रचना करणे, १०० व २०० मीटर अंतराची आखणी करणे, मतदानाच्या दिवशी इव्हीएम मशीनची जोडणी करुन मॉकपोल घेणे, मॉकपोल नंतर उमेदवाराच्या प्रतिनिधीना व्हीव्ही पॅटमधील चिठ्ठ्या मोजून दाखवणे, या चिठ्ठ्या गुलाबी रंगाच्या लिफाफ्यात सींल करणे ईव्हीएम मशीन सिल करुन मतदानाची प्रकिया सुरु करणे याबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी मतदान नोंदणी रजिस्टर १७ अ, मतदार ओळख पत्रे, केंद्रअध्यक्षची दैनंदिनी, १७ सी फॉर्म, आव्हानीत मते, प्रदत्त मते,अक्षेपीत मते इत्यादी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी आयोगाला सादर करावयाची आकडेवारी, भरावयाचे सर्व प्रपत्रे, संविधानीक व असंविधानीक लिफाफे इत्यादीबाबत प्रशिक्षणा दरम्यान माहिती देण्यात आली. सीयूचे डिसप्ले युनिट, कॅडीडेट व बॅटरी सेक्शन, सीयुचे सिलींग करणे, व्हीव्हीपॅट चे सिलींग करणे, इत्यादीबाबत माहिती देऊन सर्वांकडून मशीन जोडण्याचे प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले. क्यु. आर. कोड च्या माध्यमातुन निवडणूक प्रशिक्षणाचे आवश्यक साहित्य उदा. मराठी, हिंदी भाषेतील निवडणूक आयोगाचे तयार केलेले व्हिडिओज व पी.पी.टीज प्रशिक्षार्थींना उपलब्ध करुन देण्यात आल्या व चक्रीका ॲप डाऊनलोड करुन घेणेबाबत सूचना देण्यात आल्या.