पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराणे वेग घेतला आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी पदयात्रा आणि रॅली च्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते. पाटील इस्टेट मधील झोपडपट्टी पुनर्वसनाचा, पुनर्विकासचा प्रश्न अनेक वर्षे रखडलेला आहे, इथल्या एकाही कुटुंबाला वाऱ्यावर न सोडत हा प्रश्न राज्य सरकारच्या मदतीने सोडवू असे आश्वासन मनिष आनंद यांनी आज दिल.
पाटील इस्टेट भागात काढण्यात आलेल्या पदयात्रे दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आनंद यांनी हे आश्वासन दिले.
पुढे बोलताना मनिष आनंद म्हणाले, मी आमदार झाल्यावर शिवाजीनगर मतदारसंघातील झोपडपट्टी, वस्ती विभागाचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्याचा माझा निर्धार आहे. पाटील इस्टेट मधील लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय म्हणजे या लोकांना नवीन जागी घर मिळाल्याशिवाय इथला पुनर्विकास होणार नाही यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने आयडिएशन सेंटर सुरू करण्याचा मानस आहे. या सेंटर च्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांच्या भरारीला राज्य आणि केंद्र सरकारचे बळ कसे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मनिष आनंद यांनी सांगितले.