पुणे,दि. ७: भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे कॅन्टोंमेंट मतदार संघातील ५ मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला असून ही मतदान केंद्र गृहनिर्माण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी कळविली आहे.
या बदलानुसार मोलेदिना टेक्नीकल ज्युनिअर कॉलेज, शंकरशेठ रोड, इलेक्ट्रीकल विभाग, खोली क्रमांक १ येथील मतदान केंद्र क्रमांक २२६ मीरा को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, शंकरशेठ रोड, सेव्हन लव्हज चौक येथे, मोलेदिना टेक्नीकल ज्युनिअर कॉलेज, शंकरशेठ रोड, इलेक्ट्रीकल विभाग,खोली क्रमांक २ येथील मतदान केंद्र क्रमांक २२७ आनंद पार्क को- ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लि.प्लॉट क्रमांक ३९०-२,३,४ शंकरशेठ रोड याठिकाणी, नूतन प्राथमिक विद्यालय,टेनरी कॅम्प, नेताजी नगरजवळ, वानवडी, खोली क्रमांक १ व २ येथील मतदान केंद्र क्रमांक २४५ व २४६ नेताजी को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लि.नेताजीनगर,वानवडी येथे तसेच क्रूट मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल, वानवडी, तळमजला, खोली क्रमांक ९ येथील मतदान केंद्र क्रमांक २७३ रहेजा गार्डन फेडरेशन को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी,केदारी पेट्रोल पंप समोर,वानवडी येथे स्थापन करण्यात आले आहे.
या भागातील मतदारांनी बदललेल्या मतदान केंद्रांची नोंद घ्यावी. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन श्री.भंडारे यांनी केले आहे.