पुणे दिनांक – 16 बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांची महाराष्ट्रातील बसपा उमेदवाराच्या प्रचारार्थ फुले , शाहू ,आंबेडकरांची जन्मभूमी – कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्र पुण्यात जाहीर सभेसाठी रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी प्रादेशिक मनोरुग्णालय , मेंटल हॉस्पिटल मैदान , ई कॉमरर्झोन , आयटी पार्क समोर येरवडा , पुणे 6 या ठिकाणी दु.12 वाजता येत आहे. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र मध्ये 237 ठिकाणी स्वबळावर ताकतीनिशी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवीत आहे यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत बसपाचे खाते खुलेल व बसपा बॅलन्सिंग पॉवर म्हणून महाराष्ट्रात उभारेल असा आमचा विश्वास आहे .बसपा ही निवडणूक मते खाण्यासाठी नसून जिंकण्यासाठी लढवीत आहे येथील प्रिंट व प्रेस मीडिया यांच्या अपप्रचारास सडेतोड उत्तर या निवडणुकीने मिळेल असा प्रयत्न बसपाचा राहणार आहे या सभेस बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षांसोबत बसपाचे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर आकाश आनंद, बसपाचे राज्यसभेचे खासदार केंद्रीय कोऑर्डिनेटर रामजी गौतम, केंद्रीय कोऑर्डिनेटर महाराष्ट्र प्रभारी नर्मदाप्रसाद अहिरवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एडवोकेट सुनील डोंगरे, उपस्थित राहणार आहे सदर पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉक्टर हुलगेश चलवादी , महाराष्ट्र प्रदेश महासचिव काळुराम चौधरी , महाराष्ट्र प्रदेश सचिव सुदीप गायकवाड,व पुणे जिल्हा प्रभारी मोहम्मद शफी उपस्थित राहणार असल्याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप कुसाळे यांनी दिली आहे.