बारावीचा निकाल जाहीर : ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; कोकण विभागाची बाजी

Spread the love

पुणे  : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमधील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल आज, सोमवारी ऑनलाइन जाहीर होणार आहे. हा निकाल मेच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात लागेल, अशी चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी सकाळी निकालाची तारीख जाहीर केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. यंदा १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी –
विभाग- टक्केवारी
कोकण- ९६.७४
कोल्हापूर- ९३.६४
मुंबई- ९२.९३
छत्रपती संभाजीनगर- ९२.२४
अमरावती- ९१.४३
पुणे- ९१.३२
नाशिक- ९१.३१
नागपूर- ९०.६२
लातूर- ८९.४६
मुलींची नेहमीप्रमाणे बाजी –
: मुलींनी नेहमीप्रमाणेच मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याचा अर्थ या विषयांमध्ये परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. तसेच, १९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी घटली आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के होता. यावर्षी तो ९१.८८ टक्क्यांवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *