
*बोपोड़ी मशिदीत अनोखी पुढाकार : सर्वधर्मीय बंधु-भगिनींसाठी बांधवांसाठी मशिदीचे दार खुले*
पुणे – ईद-उल-फित्रच्या पवित्र दिवशी जमात-उल-मुस्लिमीन ट्रस्ट, बोपडी यांच्या वतीने सर्वधर्मीय (हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख) बांधवांसाठी मशिदीची दारे खुली करण्यात आली. मशिदीबद्दल असलेल्या गैरसमजुती दूर करण्याच्या हेतूने आणि धार्मिक एकोपा वाढवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वधर्मीय पाहुण्यांचे मशिदीत स्वागत
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध राजकीय नेते, पोलिस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मशिदीत आले होते. मात्र, यंदा त्यांना मशिदीतील संपूर्ण धार्मिक प्रक्रिया अनुभवण्याची संधी देण्यात आली. मशिदीत त्यांचे खजूर, शिरखुर्मा आणि इतर पारंपरिक पदार्थांनी स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर –
• भाजप : आनंद छाजेड़, अनिल भिसे, मयूरेश गायकवाड, संकेत कांबळे
• राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : श्रीकांत पाटील
• काँग्रेस : राजेंद्र भुतडा, विनोद रणपिसे, ॲड. नंदलाल धिवार, विशाल जाधव, अनिल पवार, ॲड. विठ्ठल अरुडे, जय चव्हाण, सुंदर ओहळ, ज्योती परदेशी, कल्पना शंभरकर, अनीता सुर्यवंशी, अजीत थेरे, प्रशांत टेके, संदीप भिसे, सुभाष निमकर
• वंचित बहुजन आघाडी : अशोक गायकवाड, संगीता धिवार
• खडकी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी
मशिदीतील भ्रमंती आणि धार्मिक प्रक्रियेची माहिती
पाहुण्यांना मशिदीतील विविध विभाग दाखवण्यात आले आणि नमाज प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली. *मौलाना मुफ्ती वाजिद यांनी मशिदीतील धार्मिक प्रक्रिया समजावून सांगितली –*
• वजूखाना (अभिषेक स्थळ) : येथे नमाजपूर्वी स्वच्छता कशी केली जाते, याबाबत माहिती दिली.
• नमाजगृह : येथे नमाज अदा करण्याची प्रक्रिया आणि त्यामागील अर्थ समजावून सांगण्यात आला.
• खुतबा स्थळ : मौलवी धार्मिक शिकवणूक देतात आणि समाजाला मार्गदर्शन करतात.
• महिला प्रार्थना विभाग : मशिदीतील महिलांसाठी असलेल्या प्रार्थना व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली.
मशिदीबद्दलच्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न
मशिदींविषयी समाजात अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. काही जण मशिदीमध्ये शस्त्रसाठा केला जातो, राष्ट्रविरोधी कारवाया होतात, असे गैरसमज बाळगतात. मात्र, मशिदीला भेट दिल्यानंतर सर्वधर्मीय पाहुण्यांचे हे गैरसमज दूर झाले. त्यांनी मशिदीतील प्रत्येक कोपरा पाहिला आणि इथल्या शांत, भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेतला.
प्रमुख मान्यवरांचे मनोगत आणि कृतज्ञता
*कार्यक्रमाचे आयोजन जमात-उल-मुस्लिमीन ट्रस्ट, बोपीडी* यांच्या वतीने करण्यात आले.
या उपक्रमात बाबासाहेब सौदागर, मुनाफ हारून शेख, डॉ. निसार, सलीम बेपारी, फारूक पीरजादे आणि इतर मुस्लिम नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाच्या शेवटी ॲड. नंदलाल धिवार यांनी सर्वधर्मीय पाहुण्यांच्या वतीने मुस्लिम समाजाचे आभार मानले.
सर्वधर्मीय एकोपा आणि आनंदाची अनुभूती
सर्वधर्मीय पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी मुस्लिम समाजाच्या प्रार्थनेची प्रक्रिया समजून घेतली आणि मशिदीच्या आतून अनुभव घेतल्याचा आनंद व्यक्त केला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे धार्मिक सौहार्द आणि समता वाढण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
*- अनवर शेख*
*(लेखक, बँकर, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक)*