गोरगरीब रुग्णांना हॉस्पिटल मध्ये जाणे परवडत नसल्या मुळे अशा रुग्णांना मोफत उपचार आणि औषधे मिळावीत या उद्देशाने बोपोडी भागातील भाऊ पाटील पडाल वस्ती येथे सावित्रीबाई फुले महिला मंडळ जय गणेश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रुग्ण हक्क परिषद यांच्या विशेष सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यास बोपोडी ,औंधरोड चिखलवाडी भागातील नागरिकांनी तपासणी करून सहभाग घेतला. आरोग्य शिबिराचे उदघाट्न राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणेशहर अध्यक्ष प्रशांतजी जगताप यांच्या हस्ते झाले, प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. नगरसेवक श्रीकांतजी पाटील, प्रमुख पाहुणे रुग्ण हक्क परिषद अध्यक्ष उमेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयजी महाले, प्रमुख आयोजक अध्यक्षा सुवर्णाताई पांडुळे, शिवाजीनगर अध्यक्षा दिलशाद अत्तार, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष सतीश शहा, सनी बहिरट, काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा,राष्ट्रवादी काँग्रेस पुणे उपाध्यक्ष विजय जाधव, बोपोडी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव, काँग्रेस नेते ऍड. रमेश पवळे, ऍड. नंदलाल धीवार, काँग्रेस कार्यकर्ते छोटू पिल्ले, काँग्रेस प्रवक्ते करीम तुर्क, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यक अध्यक्ष सादिकभाई शेख, प्रशांत टेके, अतुल आगळे, सोशल मीडियाचे मोहंमद शेख,साजिदभाई शेख,अन्वर शेख, गणेश लालबेगी, गुणवंत पवार, काँग्रेस अध्यक्षा रमाताई भोसले, वॉर्ड अध्यक्षा कांताताई ढोणे, सुंदरताई ओव्हाळ,मोनिका पठारे, अख्तरी शेख, रेश्मा कांबळे, अशोक गायकवाड,अंकुश साठे,रवी नायर, सिद्दिक पठाण, विशाल पवार, हनुमंत कांबळे, बाळा खरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस शशिकांत पांडुळे सूत्रसंचालन इंद्रजित भालेराव आणि आभार स्वाती जाधव यांनी मानले. आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी रत्नमाला कदम, किरण आंबिडे, अश्विनी चोपडे, पूजा जगताप, जीजू सरोदे, कदम सुनील भालेराव, गणेश गायकवाड, सुनील गायकवाड, रोहित जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
भाऊ पाटील पडाळ वस्ती येथे आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद.
