
शिव छत्रपतींना’ पुढे करून काँग्रेस वरील टिका बेजबाबदार व तथ्यहीन..!
पुणे : शिव छत्रपतींच्या रयतेच्या राज्याची संकल्पना ऊदधोषित करणारी ‘शिवमुद्रेची प्रतिमा’ भारतीय संविघानात तसेच महाराष्ट्राच्या राजमुद्रेत असुनही, शिवेंद्रराजेंना ती दिसू नये.. हे महाराष्ट्राचे दुर्दैव.. असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी मंत्री शिवेंद्र राजे यांनी काँग्रेसवर केलेल्या चुकीच्या, बेजबाबदार व तथ्यहीन आरोपांना उत्तर देतांना केली.
रयतेप्रती, जनतेच्या नित्य जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल देण्याचे कुटील कारस्थान भाजप सत्ताधारी करत असून आता सातारा गादी चे वंशंजांचाही दुरुपयोग भाजप करत आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्या प्रती, जनते प्रती, सत्य, निष्ठा व अस्मितेचे रक्षण करणारे होते हे प्रथम समजले पाहिजे.
काँग्रेस काळात शिव छत्रपतींच्या नांवे व महाराजांच्या प्रती निष्ठा समर्पित करून उभारलेल्या संस्था, विद्यापीठे, इन्फ्रास्ट्रक्चर, विमानतळे, स्मारके इ ची मालीका त्यांनी सांगितली.
महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती शिवाजी पुरस्कार (६९-७०) साली सुरु झाला.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम पुणे (बालेवाडी), कोल्हापूर, रत्नागिरी .. इ ठीकाणी काँग्रेस सत्ताकाळात सुरु झाली
विक्टोरीया टर्मिनस (व्हीटी) चे नामकरण (सीएसटी) “छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस” असे तत्कालीन रेल्वेराज्य मंत्री सुरेश कलमाडी काँग्रेस सरकार काळात झाले.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कलश तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आणल्यावर राज्याची राजधानी झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळाचे’ नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे काँग्रेस काळात झाले परंतू आता मात्र त्याचे नांव अडानी एअरपोर्ट करण्याचे प्रयत्न शिवेंद्रराजे ना दिसत नाही काय(?) असा उपहासात्मक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला…!
संसदेत भाजप खासदाराची मजल पुर्व जन्मी नरेंद्र मोदी हे शिवाजी महाराज होते.. इथपर्यंत बोलण्या पर्यत जाते.. हे शिवेंद्र राजे भोसले यांना मान्य आहे काय..?
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आंतरराष्ट्रीय स्तरावर होण्यासाठी १९ फेब्रुवारी हा दिवस (इंग्रजी तारखे प्रमाणे) निश्चित करण्याचे महतपुर्ण कार्य काँग्रेस राज्य सरकार काळात झाले.. महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठाची स्थापना काँग्रेस काळात झाली याचे ही विस्मरण शिवेंद्र राजेंना झाले काय..?
पुणे मनपा’ची शिवाजी महाराज जयंती’ १९ फेब्रु रोजीच साजरी करण्याच्या हेतुने व मोठ्या संख्येने शिवप्रेमीं’चा सहभाग व्हावा या करीता ऊत्तेजनार्थ बक्षीसे व पारीतोषिके तर आपण स्वतः मागणी प्रस्ताव देऊन तत्कालीन महापौर मोहनसिंह राजपाल यांचे कारकिर्दित २०१० साली सुरू केली याचा अभिमान वाटत असल्याचे ही काँग्रेस राज्य प्रवक्ते व पुणे मनपाचे माजी नगरसेवक गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले..!
प्रतापगढ, शिवनेरी – जुन्नर परीसर ते बालेवाडी, पुणे शहरातील शिव छतेरपतींची स्मारके भव्य श्वानावरील बहुतांश सर्व पुतळे हे काँग्रेस सत्तेच्या राजवचीतच विविध जिल्हा – तालुका स्तरावर झाली ते पर्वा कोल्हापुर मघील शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस नेते राहूलजी गांधी यांचे हस्ते ६ आक्टो २४ ला केले. राज्यातील ही सर्व स्मारके, तत्कालीन पंतप्रघान पं नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापना वर्षात ‘प्रताप गडा’ वरील अनावरण केलेला अश्वारुढ पुतळा वर्षा नु वर्षे ‘उन वारा पाऊस’ अंगावर घेत दिमाखात ऊभी आहेत.. पंतप्रधानांनी अनावरण केलेल्या सिंधूदुर्ग येथील भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या पुतळ्या प्रमाणे घारातिर्थी झाला नाही.. ईकडे देखील शिवेंद्र राजे लक्ष देतील काय..? महाराष्ट्रातच नव्हे तक विविघ राज्यांच्या राजधानीत, मंत्रालय मुख्वयद्वारे, संसदेत तसेच राज्याची अस्मिता दर्शवणाऱ्या स्थळांवर व ठिकाणांवर, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे कोणाच्या कारकिर्दित ऊभे राहीले याची माहीती शिवेंद्रराजेंनी घेतली तर काँग्रेस पक्षाने महाराजां प्रती, त्यांच्या विविघ धर्मिय्ंसह १८ पगड जातींना बरोबर घेऊन रयतेचे राज्य करण्याच्या संकल्पने प्रती खरे कृतीशील योगदान कोणाचे याचा बोघ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे योगदान समजेल व शिव छत्रपतीं बाबत भाजप करीत असलेले संकुचित राजकारण लक्षात येईल, असेही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, जनतेचे कोट्यावघी रुपये खर्ची पाडून, कोट्यावधींच्या पान भर जाहीरातबाजी करून ‘अरबी समुद्रात’ दस्तूर खुद्द पंतप्रघान मोदीं च्या हस्ते भुमिपुजन होऊन देखील दशकभराचा कालावधी ओलांडून देखील आपल्याच घराण्यातील श्रीमंत संभाजी राजे यांनी बोटी द्वारे व दुर्बिण लाऊन मुंबई समुद्रात केलेल्या पाहणीत त्यांना आढळला नाही तसेच मुंबई सह महाराष्ट्राच्या जनतेस ही अद्याप नजरेस पडला नाही.. याचे कारण काय (?) व ही मोदी – फडणवीसांच्या भाजप सरकारने केलेली महाराजांची थट्टा नाही काय(?) यावर ही थोडे विचार मंथन करावे असे ही काँग्रेस ने म्हंटले आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या ऊमेदवारीचा पर्याय समोर असतांना श्रीमंत शाहू महाराज यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची निवड केली या कडे ही त्यांनी लक्ष वेधले.
या ऊलट.. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजां विषयी, शंभूराजे संभाजी महाराजां विषयी, दोघांच्याही शौर्य – पराक्रम ईतिहासा विषयी… कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे दस्तुरखुद्द राज्यपाल कोश्यारी सह पुर्वीच्या जनसंघाचे संस्थापक वि दा सावरकर, मा स गोलवळकर पासून ते सोलापुरकर, कोरटकर यांनी जी मुक्ताफळे ऊधळलीत ती सर्व शिवेंद्र राजेंच्या गीनतीत नाहीत काय (?) वा जाणीव पुर्वक दुर्लक्षीत करू इच्छीतात (?) असा संतप्त सवाल काँग्रेस ने केला.. व शिवाजी महाराजांच्या रयते प्रती, बळी राजा प्रती, महीला भगीनींच्या सुरक्षेचा वारसा आणि वसा खऱ्या अर्थाने जर कोणी अंमलात आणला असेल तर काँग्रेस पक्षानेच आणला हे वरील वास्तवता दर्शवणाऱ्या बाबीं वरून स्पष्ट होत असल्याचे ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे..!