मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या पुण्यातील कोथरूड येथील नवीन शोरूमचे उद्घाटन

Spread the love

 

पुणे, : विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराफ पेढी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने पुण्यातील एरंडवणे येथील कर्वे रोडस्थित त्यांच्या नवीनतम शोरूमच्या उद्घाटनाची आज अभिमानाने घोषणा केली. ३,७५० चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले हे नवीन विक्री दालन ग्राहकांना विविध डिझाइन आणि शैलींमधील दागिन्यांच्या उत्कृष्ट संग्रहासह जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्यासाठी विकसित केले गेले आहे. या नवीन दालनाचे उद्घाटन हे ब्रँडच्या अपवादात्मक कारागिरी आणि सेवा वैशिष्ट्यांसह पश्चिम भारतात आपला ठसा वाढवत नेण्याच्या वचनबद्धतेच्या दिशेने प़डलेले आणखी एक पाऊल आहे.

हे नवीन शोरूम पश्चिम भारतातील ब्रँडचे ४५ वे विक्री दालन आहे, ज्यामुळे या प्रदेशात मलाबारची उपस्थिती आणि नेतृत्व आणखी मजबूत बनले आहे. नवीन शोरूमच्या उद्घाटन समारंभाला माननीय प्रमुख पाहुण्यांमध्ये, महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राच्या नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्यासह इतर मान्यवरांमध्ये माननीय खासदार श्री श्रीरंगप्पा बारणे; मा. खासदार आणि शिवसेना नेते श्री गजानन कीर्तिकर, माननीय खासदार श्रीमती मेधाताई कुलकर्णी; माननीय मा खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील; माननीय आमदार श्री हेमंत रासने; महाराष्ट्र विधानसभेचे माननीय माजी सदस्य श्री रवींद्र धंगेकर, नगरसेवक श्री श्रीनाथ भीमाले आणि नगरसेवक श्री पृथ्वीराज सुतार यांच्यासह मलाबारच्या व्यवस्थापन पथकातील सदस्य, मौल्यवान ग्राहक आणि हितचिंतक यांची उपस्थिती होती.

भारत, दक्षिण आशिया, आखाती देश, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह १३ देशांमध्ये ३९० हून अधिक शोरूम्सच्या जागतिक उपस्थिती विस्तारलेले, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स त्याच्या विस्तृत संग्रह, अपवादात्मक गुणवत्ता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहे.

नवीन शोरूममध्ये विविध आवडी आणि प्रसंगांना अनुरूप डिझाइन केलेले सोने, हिरे, प्लॅटिनम, रत्न आणि चांदीच्या दागिन्यांचा विस्तृत संग्रह उपलब्ध आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला प्रतिबिंबित करणाऱ्या पारंपारिक डिझाइनपासून ते आधुनिक संवेदनशीलतेसाठी समकालीन शैलींपर्यंत, शोरूम विविध पसंतींना पूर्ण करतो.

या शुभ प्रसंगानिमित्त दिलेल्या निवेदनात, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद म्हणाले,
“आम्हाला पुण्यातील कोथरुड येथे हे शोरूम उघडताना खूप आनंद होत आहे, हे शहर त्याच्या गतिमान संस्कृती, समृद्ध इतिहास आणि आधुनिक वृत्तीसाठी ओळखले जाते. मलाबार गोल्ड अँड डायमंड्समध्ये, आम्ही कालातीत सुंदरतेला अपवादात्मक कारागिरीशी जोडणारे दागिने ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित आहोत. गुणवत्ता, सचोटी आणि ग्राहकांच्या समाधानावर भर देऊन, आम्ही दागिन्यांचा सर्वोत्तम संग्रह पुण्याच्या उत्साही जनसमुदायापुढे प्रस्तुत करण्यास आणि आमच्या ग्राहकांना एक अविस्मरणीय खरेदी अनुभव प्रदान करण्यास उत्सुक आहोत.”

ग्राहकांना एक निर्दोष खरेदी अनुभव देण्यासाठी शोरूमची रचना केली गेली आहे, ज्यामध्ये सुंदर प्रदर्शनीय दालने आणि ग्राहकांना त्यांचे परिपूर्ण दागिने निवडण्यात मार्गदर्शन करण्यासाठी एक उच्च प्रशिक्षित कर्मचारी संघ आहे. या जागेच्या निवडीचे उद्दिष्ट ग्राहकांना प्रशस्त आतील भाग आणि भरपूर पार्किंग सुविधेसह एक अतुलनीय दागिने खरेदी अनुभव प्रदान करणे आहे.

या शोरूमचे उद्घाटन मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या जगातील सर्वात पसंतीचे ज्वेलर्स बनण्याच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारे देखील आहे. पारंपारिक कारागिरीला आधुनिक नवोपक्रमासह एकत्रित करून शाश्वतता आणि सामाजिक कल्याणाला प्राधान्य देत कालातीत नमुने तयार करणे हे ब्रॅण्डचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *