* स्व. लक्ष्मण जगताप यांच्या दूरदर्शी विचारांमुळे न्यायप्रणालीचा पाया मजबूत – ऍड. गोरखनाथ झोळ
* शंकर जगताप यांचे नेतृत्व न्यायसंस्थेला नवी दिशा देईल; वकील संघटनांचा विश्वास
चिंचवड : प्रतिनिधी, १६ नोव्हेंबर २०२४ – शहरातील वकिलांच्या समस्यांचे निराकरण व्हावे आणि न्यायप्रणाली अधिक सुसंगत बनवावी, यासाठी स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे चिखली येथे भव्य न्यायालय सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यांच्या दूरदर्शी विचारांमुळेच न्यायप्रणालीसाठी एक मजबूत पाया निर्माण झाला असून त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड कायदा आघाडी व संविधान विधी सेवा मंचचे सर्व वकील सदस्य एकजुटीने महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या पाठीशी उभे आहोत, असे प्रतिपादन कायदा आघाडीचे शहराध्यक्ष ऍड. गोरखनाथ झोळ यांनी केले.
संविधान विधी सेवा मंचच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील स्नेह मेळाव्याचे पुनावळे येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ७०० वकील बंधू आणि भगिनी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऍड. झोळ म्हणाले की, सेक्टर क्रमांक १४ येथील न्यायालयाच्या जागेवर इमारत बांधण्यासाठी स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांनी ४ नोव्हेंबर २०२० रोजी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार २०२०-२१च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी १२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच नेहरूनगर येथील इमारत सर्व सोयी साधनसामग्रीयुक्त करण्यासंदर्भातही २८ फेब्रुवारी २०२१ रोजी लक्ष्मणभाऊंनी पत्र दिले होते. अशाप्रकारे सातत्याने शहरातील वकिलांना पाठबळ देण्याचे काम स्व. लक्ष्मणभाऊंनी केले होते.
यावेळी भाजपचे प्रदेश कायदा सेलचे प्रभारी ऍड. धर्मेंद्र खांडरे, उद्योजक विजय जगताप, भाजप कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. अशोक संकपाळ, ऍड. एस.व्ही. कोळसे पाटील, पिंपरी चिंचवड अडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. सुभाष चिंचवडे, ऍड. एस.बी. चांडक, ऍड. उत्तम चिखले, ऍड. मदन छाजेड, ऍड. अशोक भटेवरा, ऍड. सुदाम माने, ऍड. किरण पवार, ऍड. सुनील कडुसकर, ऍड. दिनकर बारणे, ऍड. सचिन थोपटे, महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. आतिष लांडगे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष ऍड. कैलास पानसरे, एस.टी महामंडळाचे कायदे सल्लागार ऍड. अतुल गुंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे, प्रशांत शितोळे, आप्पा रेणुसे, ऍड. उर्मिला काळभोर, ऍड. संगीता परब, ऍड. सुजाता बिडकर, ऍड. मोनिका सचवानी, ऍड. महेश टेमगिरे, ऍड. मेरी रणपिसे यांच्यासह शहरातील वकील बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवड लिगल सेलचे प्रमुख पदाधिकारी ऍड. प्रफुल्ल टिळेकर, ऍड. गोरख कुंभार, ऍड. पल्लवी विघ्ने, ऍड. दत्ता झुळुक, ऍड. मंगेश लाहोरे, ॲड. प्रशांत भागवत, ऍड. पुनम स्वामी – प्रधान, ऍड. हर्षद नढे, ऍड. सोपान पाटील, ऍड. प्रेरणा चंदानी, ऍड. श्रीधर यलमार, ऍड. परेश नरूटे, ऍड. सुषमा वसाने, ऍड. प्रतिक कुदळे, ऍड. पुनम राऊत, ऍड. अजितकुमार जाधव, ऍड. रोहन देशपांडे, ऍड. प्रशांत पल्हारे, ऍड. अंकुश गोयल, ऍड. विठ्ठल पोखरकर, ऍड. सचिन राऊत, ऍड. पुनम शर्मा, ऍड. काजल वायकर, ऍड. विकास नेवाळे, ऍड. विशाल प्रधान, ऍड. विठ्ठल सोनार, ऍड. गोरख आव्हाड, ऍड. अंतरा देशपांडे, ऍड. मयुरी काकडे, ऍड. प्रिया पुजारी, ॲड. वृषाली पाटील, ऍड. भारती पुरोहित, ऍड. चित्रा फुगे, ऍड. श्रुती जोगळेकर, ऍड. खुशबू जैन, ऍड. वैशाली गुंडावडे, ऍड. सौरभ जगताप यांनी परिश्रम घेतले.
सदर मेळाव्याचे सुत्रसंचालन ऍड. पल्लवी विघ्ने व ऍड. हर्षद नढे यांनी केले. तर ऍड. पूनम राऊत यांनी आभार व्यक्त केले.