महिला सशक्तीकरणासाठी आणि विकासासाठी भीमथडी जत्रा प्रेरणादायक व दिशादर्शक – शरद पवार
पुणे, – सध्या पुण्याच्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल ग्राउंड, सिंचन नगर येथे सुरू असलेल्या भीमथडी जत्रेत आदरणीय श्री शरद पवार यांनी भेट देऊन स्टॉल धारकांशी संवाद साधला. जत्रेच्या विविध विभागांना भेट देताना, श्री पवार यांनी कलाकार, कारागीर, शेतकरी व बचत गटांशी संवाद साधला आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण वारशाचे, तसेच नाविन्यपूर्णतेचे प्रदर्शन करण्यासाठी समर्पित असलेल्या भिमथडीच्या कार्याचे कौतुक केले.
आपल्या भाषणात श्री पवार यांनी भीमथडी जत्रेच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना भीमथडीने ग्रामीण-शहरी दरी कमी करण्यासाठी या जत्रेने ग्रामीण समुदायांना, विशेषतः महिला उद्योजकांना सक्षम करण्याचे काम केले असल्याचे सांगितले.
या वर्षीची भीमथडी जत्रा पद्मश्री डॉ अप्पासाहेब पवार यांच्या 25 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना समर्पित केली असून या भीमथडीचे वैशिष्ट्ये अशी….
1) महाराष्ट्रातील 21 जिल्ह्याचा सहभाग :- त्यामध्ये अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, जालना, यवतमाळ, अमरावती, सोलापुर, भंडारा, नाशिक, रत्नागिरी, पालघर, रायगड, मुंबई, हिंगोली, नंदुरबार जळगाव ,धुळे , बीड, लातूर व नागपुर या मधील एकुण 300 महिला बचत गट व महिला उद्योजिका यांचे स्टॉल आहेत.
2) महाराष्ट्रसह 13 राज्यांचा सहभाग – यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, तेलंगाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, असाम, आंध्र प्रदेश, बिहार, राजस्थान , काश्मिर व पशिम्ं बंगाल – या राज्यातील हस्तकलेचे एकुण 30 स्टॉल आहेत.
3) जी आय मानांकन असलेले 6 स्टॉल असून त्यामध्ये सोलापुरची ज्वारी, आजरा येथील तांदूळ, रत्नागिरीचा कोकनी मेवा, जालन्याची मोसंबी, यवतमाळची हळद, इत्यादी पदार्थ पुणेकरांच्या पसंतीस उतरत आहेत.
4) चालू भीमथडीत शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 20 स्टॉल्स आहेत.
5) भीमथडीच्या माध्यमातून आजपर्यंत उभे राहिलेले उद्योग…..- संतकृपा महिला गृह उद्योग, येसुर मसाले उद्योग, साधना किचन यासारखे 14 मोठे उद्योग उभे राहिले आहेत.
तर 313 लघू उद्योग महिला बचत गटांना उभे केले आहेत.
6) चालू वर्षी भीमथडीत- 4 कोटी 50 लाख उलाढाल अपेक्षित आहे.
या सर्वांच्या माध्यमातून भीमथडी जत्रा बचत गटांसाठी आदर्श व्यासपीठ बनली आहे, ज्याद्वारे महिला उद्योजक आपल्या कार्यक्षेत्रात नवीन उंची गाठू शकतात.
भेटीदरम्यान, श्री पवार यांनी जत्रेतील प्रमुख आकर्षणांना भेट दिली, त्यामध्ये
अप्पासाहेब पवार दालन :
शेतकरी उत्पादन विभाग: भौगोलिक मानांकन विभाग-
स्वयंसिद्धा विभाग:-
खाद्य महोत्सव विभाग:-
आदी सर्व विभागांना श्री पवार यांनी भेटी देऊन महिलांशी संवाद साधला व त्यांचा उद्योजकीय प्रवास सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले.
जत्रेच्या या वर्षीच्या विशेष उपक्रमांमध्ये परागकण संवर्धनासाठी स्वदेशी वनस्पती उद्यान आणि #ShareYourPrivilege मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यामुळे या जत्रेने पर्यावरणीय शाश्वतता आणि सर्वसमावेशकतेसाठी सामूहिक कृतीची आवश्यकता यावर जोर दिला आहे.
भीमथडी जत्रेच्या मुख्य अयोजिका सौ सुनंदा पवार यांनी श्री पवार यांच्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले, “त्यांच्या उपस्थितीने आमच्यात आणखी एक सकारात्मक शक्ती निर्माण झाली आहे, आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण हृदयाचा उत्सव साजरा करण्याच्या आमच्या उद्दिष्टाला बळ दिले आहे. त्यांच्या प्रोत्साहनाने आम्हाला या उपक्रमास आणखी एक पाऊल पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली आहे.”