
पिंपरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई रेल्वे पटरीजवळ, पिंपरी परिसरात सापळा रचून करण्यात आली.
पोलिस कर्मचारी रोहित वाघमारे आणि गणेश काकड यांना त्यांचा बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक इसम देशी बनावटीची पिस्टल घेऊन रेल्वे पटरीजवळ थांबला आहे. या माहितीच्या आधारे सपोनि दिगंबर अतिग्रे, पो. अं. झांबरे, तळपे, वाघमारे, काकड आणि ढवळे यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
जप्त मुद्देमाल:
- एक देशी बनावटीची पिस्टल
- एक जिवंत राऊंड
अटक केलेल्या आरोपीचे संपूर्ण नाव:
ओंकार उर्फ अण्णा बाळू हजारे (वय २३), रा. मोरया हाउसिंग सोसायटी, बिल्डिंग नं. २, रूम नं. ४०१, वेताळ नगर, चिंचवड.
गुन्हेगारी पार्श्वभूमी:
हजारे हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे:
- चिंचवड पोलीस स्टेशन गु.र.नं. 266/2020 – IPC 395
- चिंचवड पो.स्टे. गु.र.नं. 123/2021 – IPC 387, 392
- चिंचवड पो.स्टे. गु.र.नं. 204/2021 – IPC 392, 352
- MIDC भोसरी गु.र.नं. 356/2021 – IPC 307 व शस्त्र कायदा कलम 4, 25
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.