यूएसए येथील अ‍ॅकॅडमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीस व अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस यांच्या वतीने विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड यांना ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हार्मोनी अँड इंटरफेथ डायलॉग’ ह्या पुरस्कारा ची घोषणा

Spread the love

 

ः अमेरिकेहून प्रतिनिधी २ जून ला पुण्यात येऊन करतील सत्कार!

पुणे दि.३० मे: गेल्या चार दशकांहून अधिक काळ शिक्षण, तत्वज्ञान, अध्यात्म, जागतिक शांती, सांप्रदायिक सद्भाव, वैश्विक बंधुत्व आणि इतर क्षेत्रात अहोरात्र कार्य करणारे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, यांना अमेरिकेतील विविध संस्थांतर्फे ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हार्मोनी अँड इंटरफेथ डायलॉग’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य रेक्टर प्रो.डॉ. मधू कृष्णन यांनी दिली.
विश्वशांतीसाठी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या समर्पित जीवनाची दखल घेत यूएसए येथील अकादमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीस आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस यांच्या वतीने हा पुरस्कार २ जून २०२५ रोजी दुपारी ४ वा. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहा मध्ये देण्यात येणार आहे. यूएसए येथील या संस्थेचे प्रतिनिधी स्वतः पुण्यात येऊन डॉ. विश्वनाथ कराड यांच्या सत्कार करणार आहेत.
तसेच, डॉ. कराड यांना चार सन्मानपत्र ही देण्यात येणार आहेत. यामध्ये ‘द अमेरिकन युनिव्हर्सिटी यूएसए’, यांच्या वतीने ‘प्रोमोनन्ट ऑफ ग्लोबल पीस अवार्ड २०२५’, ‘सर्टीफिकेट ऑफ एक्सलेन्स’,‘बेस्ट नॅशनल बिल्डर्स लीडर्स अ‍ॅवार्ड २०२५’ आणि युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस यांच्या वतीने ‘पीस अ‍ॅम्बेसेडर’ ह्या सन्मानाचा समावेश आहे.
डॉ. विश्वनाथ कराड हे एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ आहेत. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून मूल्याधारित वैश्विक शिक्षण प्रणाली अंमलात आणण्याचे त्यांचे उदात्त ध्येय आहे. जगातील सर्वात मोठ्या विश्व शांती घुमटाची निर्मिती केली आहे. यामध्ये अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून त्याला ओळखले जाते. त्यामाध्यमातून जगाला शांतीचा सर्वधर्मसमभावाचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला जात आहे.

जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *