Spread the love

 

पुणे – फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक आणि अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रभर आवाज उठविणारे रिपब्लिकन स्वाभिमानी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आयु. जिवन घोंगडे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबई-पुणे रोडवरील सादिकभाई शेख यांच्या कार्यालयात केक कटिंग करून, आनंदमय वातावरणात हा सोहळा पार पडला.

या प्रसंगी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक श्रीकांतजी पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. रमेश पवळे, काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, रिपाईचे ज्येष्ठ नेते संजयजी कांबळे, स्वीकृत नगरसेवक करीमलाला शेख, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मुल्ला, अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रफिकभाई कुरेशी, रिपाई नेते आनंद धेडे, दै. सम्राटचे पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता सूर्यवंशी, देवी ट्रस्ट अध्यक्ष ईश्वर आगरवाल, ऍड. घोलप, जनजागृती अध्यक्ष विजय जगताप, रेल्वे कमिटी सदस्य विनोद सोनवणे, संदीप शेंडगे, बहुजन समाज पार्टी प्रभारी प्रभाकर खरात, अकबर शेख, जय चव्हाण, नाजीम मणियार, अनिल स्वामी, नितीन कांबळे, सलमान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकता मानव सेवा संघटनेचे अध्यक्ष सादिकभाई शेख यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक श्रीकांतजी पाटील यांनी आयु. जिवन घोंगडे आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन मरफाळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला.