रेफ्री आणि कोच साठी रोलबॉल फेडरेशन चे प्रशिक्षण शिबीर संपन्न” – पंच आणि प्रशिक्षक खेळाचा आत्मा – संदीप खर्डेकर

Spread the love

“रेफ्री आणि कोच साठी रोलबॉल फेडरेशन चे प्रशिक्षण शिबीर संपन्न” – पंच आणि प्रशिक्षक खेळाचा आत्मा – संदीप खर्डेकर.

*क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रूप तर्फे खेळाडूंना वॉटर डिस्पेन्सर व स्पीकर सेट भेट – संदीप खर्डेकर*.

वर्षभर रोलबॉल च्या विविध वयोगटातील खेळाडूंच्या शहर, जिल्हा, राज्य, विभाग, व राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्पर्धा देशात सुरु असतात, ह्या स्पर्धांसाठी पंच आणि प्रशिक्षक हे दोघेही महत्वाचे असतात असे रोलबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.शिबिराच्या समारोप समारंभात ते बोलत होते.यावेळी रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे,मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, इराणी कॅफे चे मालक अलिभाई इराणी,पदाधिकारी आनंद यादव, अशोक काळे, चेतन भांडवलकर, दादासाहेब भोरे, प्रमोद काळे, शैलेंद्र पोतनीस व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षक हा गुरु समान असतो आणि त्याने उत्तमोत्तम खेळाडू घडवायचे असतात तर निष्पक्ष पंच हा कुठल्याही खेळाची आत्मा असतो. निरपेक्ष पणे स्पर्धेदरम्यान मैदानावर न्याय देणारा पंच आणि खेळाडूंचे गुण दोष हेरून त्यांना प्रोत्साहित करणारा प्रशिक्षक हे दोघेही महत्वाचे असतात असेही संदीप खर्डेकर म्हणाले.

रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे रोलबॉल खेळाचा प्रचार आणि प्रसार सतत सुरु असतो व खेळाडूंसाठी सातत्याने नवीन कोच व स्पर्धेसाठी नवीन पंच (रेफ्री) तयार करण्याची प्रक्रिया सुरु असते, त्यालाच अनुसरून देशभरातून आलेल्या पंच व प्रशिक्षक यांचे प्रशिक्षण शिबीर पुण्यातील बालेवाडी येथील रोलबॉल स्टेडियम येथे पार पडले असे या खेळाचे जनक राजू दाभाडे यांनी सांगितले. खेळातील तज्ज्ञ व्यक्तींनी चार दिवस सुरु असलेल्या शिबिरात मार्गदर्शन केले व प्रशिक्षण दिले असेही त्यांनी स्पष्ट केले.
लवकरच ज्युनियर विश्वकप स्पर्धा केनिया येथे होणार असून ( 17 वर्षाखालील ) आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यासाठी उत्तम पंच व प्रशिक्षक तयार करण्याचे कार्य सुरु असल्याचेही सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खेळाडूंच्या सोयीसाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुपच्या वतीने रोलबॉल स्टेडियम साठी स्पीकर सेट आणि थंड व गरम पाण्याची व्यवस्था असणारा वॉटर डिस्पेन्सर भेट देण्यात येत असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.ग्लोबल ग्रूप ह्या वर्षी खेळांना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असून सर्वतोपरी मदत देणार असल्याचे संचालक संजीव अरोरा व मनोज हिंगोरानी यांनी स्पष्ट केले.
लवकरच पुणे मनपा आणि स्मार्ट सिटी प्रकलपांतर्गत मां. बालेवाडी येथील स्टेडियम आच्छादित करण्यात येणार असून त्यामुळे बारा महिने खेळाडूंना खेळाचा आनंद लुटता येईल. त्यादृष्टीने बजेट मध्ये तरतूद करण्यात आली असून लवकरच हे काम सुरु होईल असेही रोलबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *