लढवय्या बापाची लढवय्यी लेक! वैभवी देशमुखला बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश… शशिकांत पाटोळे*

Spread the love

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीडच नव्हे तर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडसह राज्यात मोठे मोर्चे निघाले. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतरच्या या मोर्चात त्यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख अग्रभागी होते. वडिलांच्या या निर्घृण हत्येचं दु:ख मनात ठेवत वैभवीने बारावीची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.
वैभवी आपल्या वडिलांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन म्हणाली, आज तुम्ही हवे होता… खऱ्या अर्थाने आपल्या मुलीचे तोंड भरून कौतुक करण्यासाठी तिचे वडील हवे होते. संतोष देशमुख यांच्या जाण्याने जी पोकळीक निर्माण झाली आहे ती उणीव कुटुंबीयांना जाणवत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *