
पुणे : महाराष्ट्रात प्रामुख्याने पुण्यात विविध प्रकारचे अंमली पदार्थ खुलेआम पणे विक्री होत आहे. अश्या प्रकारच्या गुन्हेगारीकडे युवक वर्ग वळण्याचे एकच कारण आहे , बेरोजगारी . वाढती बेरोजगारी, महागाई, व्यसनाधीनता आणि भविष्याची अनिश्चितता यातून बरेच युवक गुन्हेगारीकडे वळत असून यातून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशातील व प्रामुख्याने महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे. युवक वर्ग गुन्हेगारीकडे वळत यास पूर्णतः केंद्र व राज्य सरकार जवाबदार आहे.
केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी युवक काँग्रेसने कंबर कसली असून ,
अनेक विविध स्थानिक पातळी वरील विषयांवर भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली १६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता काँग्रेस भवन पुणे येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे.
अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र युवक काँग्रेस सह प्रभारी एहसान खान, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया चेयरमन अक्षय जैन, प्रदेश सचिव विवेक कडू, अमोल दौंडकर
पुणे शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे यांनी माहिती दिली