‘स्वामी विवेकानंद’ यांना युवा प्रेरक (आयकॉन) बनवण्याचे महतकार्य पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले..!
“विवेकानंद जयंती” केंद्र सरकारने व “राजमाता जिजाऊ जयंती” राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात साजरे करण्याची गरज..!
पुणे : देशाचा युवा हा भविष्याचा पाया असुन, युवकांची ऊर्जा व ऊत्साह राष्ट्राच्या प्रगतीचे स्त्रोत असल्याची जाणीव तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांना होती. त्यामुळेच विश्वाला मानवतेचा व विश्व बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या चारित्र्य संपन्न स्वामी विवेकानंद यांची जयंती (१२ जाने) हा दिवस, देशभरात राष्ट्रीय युवा दिन” म्हणून साजरा करण्याचा महत्वपूर्ण व दुरगामी निर्णय दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी घेतला व ‘स्वामी विवेकानंद’ यांना केवळ हिंदूत्वाचे प्रतीक म्हणून मर्यादित न ठेवता, देशातील युवकांचे प्रेरणास्थान बनवण्याचे महतकार्य राजीव गांधी यांनी केले. त्यांच्या मुळेच १२ जाने १९८५ पासुन हा दिवस “राष्ट्रीय युवा दिन” साजरा करण्याची सुरुवात काँग्रेस सरकारच्या काळात सुरु झालीअसल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, शिक्षीत, चारित्र्यवान, समंजस व संवेदनशील युवा’ देशाच्या संविधानीक लोकशाहीचा पाया असून देशाच्या प्रगतीच्या मार्गात, युवा-वर्गा कडून उद्योग, संशोधन, विकासा बरोबरच संविधानीक राजकीय मुल्यांची प्रतिष्ठा व जपणूकीची ही अपेक्षा असल्याचे सांगितले.
रयतेचे राज्य प्रस्थापित करणाऱ्या शिव छत्रपतींना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती देखील १२ जाने असल्याने आजचा दिवस लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे देखील गोपाळदादा यांनी सांगितले.
राजीव गांधी स्मारक समिती तर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.. या प्रसंगी ज्येष्ठ काँग्रेसजन ऊमेश चाचर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, धनंजय भिलारे, गोरख पळसकर, सुरेश कांबळे, अॅड स्वप्नील जगताप, आशिष गुंजाळ, योगीराज नाईक, गणेश शिंदे, बंडू शेडगे, महेश हराळे, राजेश सुतार इ उपस्थित होते.
या प्रसंगी प्रतिमाांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धनंजय भिलारे यांनी आभार मानले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व राजीव गांधी स्मारक समिती सदस्य अविनाश गोडबोले म्हणाले की, विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्याची प्रथा राजीव गांधींनी सुरू करून देखील ही प्रथा नंतरच्या काळात प्रतिगामी विचारांच्या संघटनांनी हायजॅक केली. वास्तविक विवेकानंद जयंतीच्या व राष्ट्रीय युवा दिना’च्या उपक्रमाशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सतत सलग्न राहणे अपेक्षित आहे. आज काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी राजीव गांधी स्मारक समिती वतीने विवेकानंद आणि जिजाऊंची जयंती साजरी करणे स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.
विवेकानंद जयंती “राष्ट्रीय युवा-दिन” केंद्र सरकारने “राजमाता जिजाऊ जयंती” राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची गरज उपस्थितीतांकडून व्यक्त करण्यात आली. ‘राजमाता जिजाऊ जयंती’ व ‘राष्ट्रीय युवादिना’च्या राज्यातील भगीनींना व तरुणांना काँग्रेस पक्षा तर्फे हार्दिक शुभेच्छा’ ही राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिल्या.