पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने
“चला वाचूया, पुण्याला नवी ओळख देऊया” हा अभिनव उपक्रम 11 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 ह्या वेळेत होणार असून आम्ही यात आमच्या कुटुंबीय, मित्र परिवार व कार्यकर्त्यांसह सहभागी होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष दीपकभाऊ मानकर,भाजपा चे शहराध्यक्ष धीरज घाटे,शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद तथा नाना भानगिरे, आर पी आय चे शहर अध्यक्ष संजय सोनावणे व भाजपा चे राज्य प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले आहे.
“एक तास, वाचन ध्यास”
✨‘”शांतता …. पुणेकर वाचत आहेत” ह्या उपक्रमासाठी विविध सामाजिक संस्था संघटना , ज्ञाती संस्था, राजकीय पक्ष व विविध क्षेत्रातील सामान्य पुणेकरांशी संपर्क साधत असून सर्वांनीच ह्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्याचे मान्य केल्याचे पुस्तक महोत्सवातील ह्या उपक्रमासाठीच्या समितीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
११ डिसेंबर दुपारी १२ ते १ ह्या वेळेत पुणेकरांनी आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन करावे .
व त्याचा फोटो किंवा व्हिडिओ काढून सोबतचा QR कोड स्कॅन करून किंवा pbf24.in/register वर तो फोटो पाठवावा असे आवाहन ही दीपकभाऊ मानकर,धीरज घाटे,प्रमोद तथा नाना भानगिरे व संजय सोनावणे यांनी केले आहे.
तसेच सोशल मीडियावर #पुणेपुस्तकमहोत्सव हॅशटॅगसह पोस्ट केल्यास सहभागाबद्दल प्रमाणपत्र मिळणार असल्याचे ह्या महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
हा कोणत्याही राजकीय पक्षाचा विषय नसून यात
सर्वांनी सहभागी व्हावे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी १४ ते २२ डिसेंबर २०२४ पुणे पुस्तक महोत्सवाला ही भेट द्यावी असे आवाहन देखील दीपकभाऊ मानकर, धीरज घाटे,प्रमोद भानगिरे, संजय सोनावणे व संदीप खर्डेकर यांनी केले आहे.