श्रीमती संगिता तिवारी यांची पुणे शहर महिला कॉंग्रेस कमिटीच्या महिला प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love

अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा आणि खासदार रजनीताई पाटील , अखिल भारतीय कॉंग्रेस प्रवक्त्या शमा मोहमद महाराष्ट्र प्रदेश महिला कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या सव्वालाखे ,पुणे शहर कॉंग्रेसचे अरविंद शिंदे आणि माजी आमदार रमेशदादा बागवे यांच्या संमतीने श्रीमती संगिता तिवारी यांची पुणे शहर महिला कॉंग्रेस कमिटीच्या प्रभारी महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे श्रीमती पूजा आनंंद यानी पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांची पुणे महीला कांग्रेसच्या अध्यक्षपदवरुन पदमुक्त करण्यात आले आहे.
श्रीमती संगिता तिवारी सध्या महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा म्हणून काम करीत आहेत .यावेळी प्रदेश महीला कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती संध्या सव्वालाखे यांनी मला दिलेली जबाबदारी महिला विभागाच्या माध्यमातून नक्की पूर्ण करीन असे श्रीमती संगिता तिवारी यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *