Spread the love

पुणे : देशातील अग्रगण्य वित्तपुरवठा कंपनी ‘श्रीराम फायनान्स’ने ‘#TogetherWeSoar’ नावाची प्रेरणादायी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम परस्पर संबंध आणि एकतेचे सामर्थ्य दर्शवून देशभरातील ग्राहकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे वचन देते. भारतीय ग्राहक यशाच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा ‘तो क्या’ हा दृष्टिकोन स्वीकारत आहेत. या मोहिमेचा उद्देश या भावना साजऱ्या करणे आणि राहुल द्रविड यांच्यासोबतच्या भागीदारीतून पुढे जाण्याचे साधन म्हणून प्रेरणा देणे आहे. संदेश स्पष्ट आहे ‘टुगेदर, वी सोअर’.

प्रेरणादायक मोहीम
या मोहिमेत दिग्गज क्रिकेट खेळाडू राहुल द्रविड टीमवर्क आणि चिकाटीचे मूल्य दर्शवणारे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सहभागी झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे ‘श्रीराम फायनान्स’ची विकासाला प्रेरणा देण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी हिंदी जाहिरातीसाठी दिलेल्या दमदार आवाजामुळे ‘श्रीराम फायनान्स’च्या संदेशाला बळ मिळाले आहे. याशिवाय, तेलुगू आणि तमिळ प्रेक्षकांसाठी भाषांतरित आवृत्त्यांद्वारे विविध प्रादेशिक प्रेक्षकांशी जोडण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.

https://bit.ly/tws_m

राष्ट्रीय पातळीवरील अभियान
ही मोहीम प्रिंट, डिजिटल, टेलिव्हिजन, सोशल मिडिया आउटडोअर माध्यमे आणि निवडक चित्रपटगृहांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. पुढील दोन महिन्यांत शहरी आणि ग्रामीण प्रेक्षकांसाठी हे अभियान सादर करण्यात येणार आहे. ‘श्रीराम फायनान्स’ने प्रो कबड्डी लीगशीही भागीदारी केली आहे.
https://bit.ly/tws_m
सात भाषांमध्ये मोहिमेची निर्मिती
‘श्रीराम फायनान्स’च्या विपणन विभागाच्या कार्यकारी संचालक एलिझाबेथ वेंकटरमन म्हणाल्या, ‘टुगेदर, वी सोअर’ हे प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षांचे समर्थन करण्याच्या आमच्या वचनाचे प्रतीक आहे. फिक्स्ड डिपॉझिट्स, वाहन वित्तपुरवठा, छोटे व्यवसाय कर्ज किंवा सोने-खासगी कर्जांद्वारे त्वरित निधीपुरवठा करण्यासाठी आम्ही सात भाषांमधील सर्जनशील दृष्टिकोन स्वीकारून ग्राहकांशी जोडले जाणार आहोत.’ मोहिमेतील व्हिडिओंमध्ये राहुल द्रविड विविध लोकांना ‘श्रीराम फायनान्स’च्या सहकार्याने आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जाण्यास प्रेरणा देताना दिसतात. हे अभियान एका भव्य स्टेडियममध्ये संपते, तेथे देशभरातील लोकांना एकत्र आणण्यात आले आहे. श्रीराम फायनान्स देशाच्या आर्थिक भविष्याला आकार देण्यासाठी कटिबद्ध आहे.