सदा खोतांची विकृत टवाळी’ हेच् भाजपच्या महायुतीचे संस्कार ..!

Spread the love

‘राष्ट्रवादीच्या संस्थापक नेत्याचा’ अवमान सहन करण्याची कोणती मजबूरी अजीत पवारांच्या ठायी..? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचा संतप्त सवाल..
पुणे -निवडणुक प्रचार सभेत, राजकीय द्वेषापोटी पातळी सोडुन आरोप करतांना, शिव छ्त्रपतींच्या महाराष्ट्राची सभ्यता, जीजाऊंचे व संतांचे संस्कार व शिकवणूकीस तिलांजली देण्याचे कार्य “महायुतीच्या नेत्यांकडून” एका पाठोपठ केले जात असुन देवेंद्र फडणवीसांच्या ऊपस्थितीत गोपिचंद पडकळरांच्या सभेत सदा खोत या कथित शेतकरी नेत्याने, इंडीया आघाडीचे जेष्ठ नेते आदरणीय शरदरावजी पवार यांचे चेहऱ्यावरील शस्त्रक्रीयेचा ऊल्लेख करून व्यंगात्मक उदगार काढून टवाळी केली व विकृती पाजळवली त्याचा ‘तीव्र धिक्कार व निषेध’ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस करत असल्याचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात केला.
ते पुढे म्हणाले की, फुटीर राष्ट्रवादी पक्षाची सत्तेची अशी कोणती मजबुरी व लालसा आहे की ‘पित्यासमान असलेले जेष्ठनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अघ्यक्ष आदरणीय शरदराव पवार’ यांचे प्रती टिंगल टवाळीचे विकृती दर्शवणारे उदगार काढल्या नंतर ही.. अजीत पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शांत का..?
सदा खोतांच्या भाजप प्रणीत विकृत टवाळी विषयी जनाची नाही तर मनाची थोडी जरी लाज वाटत असेल तर केवळ निषेध न करता ‘भाजप-महायूतीती’स लाथ मारुन राष्ट्रवादीने बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या मातीच्या संस्काराशी ईमान राखावे असे आवाहन देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले…!
सदा खोतांनी फडणवीसांना शेतकरी कर्ज माफी’चे खोटे श्रेय देण्याच्या नादात.. ‘काँग्रेस प्रणीत युपीए सरकारने’ २००९ साली डॅा मनमोहनसिंग पंतप्रधान व मा शरदरावजी पवार कृषी मंत्री असतांना शेतकऱ्यांना दिलेली ७१,००० कोटींची कर्ज माफी जाणीव पुर्वक विसरले या विषयी देखील तत्कालीन राष्ट्रवादीत मोठे झालेले नेते अजीत पवार व त्यांचे सहकारी सहन करतात (?) ही सत्तेच्या लाचारीची पातळी कीव आणणारी व भाजपच्या अधीन गेल्याची पावती असल्याची संतप्त टिका देखील अजीत पवारांच्या राष्ठ्रवादीवर काँग्रेस ने केली..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *