
पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरात फेज 1 रोडवर आज सकाळी 8 च्या सुमारास व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल चक14 उथ 3548 बस ला अचानक आग लागली होती. सदर आगीत टेम्पो मधील एकूण 12 प्रवासी पैकी 04 प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना फेज-1 रोडवर दसॉल्ट सिस्टीमसमोर घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळत्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये तीन जण अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. चौथ्या व्यक्तीचा नंतर मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून अधिकार्यांनी तपास सुरू केला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होतीे.मृतांची ओळख, आगीचे संभाव्य कारण आणि आणखीन किती इतर प्रवासी जखमी झाले आहेत की नाही याबद्दल अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.