६५व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार झाडे… चंद्रकांतदादा पाटील यांचा हरित महाराष्ट्र संकल्प ६५ हजार झाडे लावली, जगवलीही

Spread the love

आपल्या आयुष्यात काही दिवस महत्त्वाचे असतात, पण काही दिवस विशेष जिव्हाळ्याचे आणि स्पेशल असतात. त्यातलाच एक म्हणजे वाढदिवस. प्रत्येक वाढदिवस आपण आपल्या प्रियजनांसोबत साजरा करतो, काही विशेष संकल्प करतो, स्वतःसाठी आनंदाचे क्षण जपतो. पण कोथरूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे लाडके नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी १० जूनला होणारा त्यांचा वाढदिवस विशेष आणि अर्थपूर्ण करण्यासाठी एक वेगळाच संकल्प केला…
हा संकल्प होता ६५ हजार वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा!
चंद्रकांतदादांनी कोणताही डामडौल न करता वाढदिवस साधेपणाने, पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देऊन साजरा करून समाजालाच एक आगळीवेगळी भेट देण्याचा निश्चय केला. ६५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ६५ हजार झाडं लावण्याचा संकल्प करून त्यांनी समाजापुढे जणू एक आदर्शच ठेवला आहे.
या संकल्पाची सुरूवात ९ जून २०२४ रोजी कोथरूडच्या विविध भागांमध्ये स्वतः वृक्षारोपण करून चंद्रकांतदादांनी केली.

आजच्या जगात बेसुमार जंगलतोड ही चिंतेची बाब आहे. वाढते तापमान आणि कमी होत चाललेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *