८ डिसेंबर रोजी कोथरूड मध्ये गांधी दर्शन शिबीर

Spread the love

 

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर होणार आहे. गांधी पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष कुमार प्रशांत (जयप्रकाश व महात्मा गांधी यांचे आंदोलन ),महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी (गांधी आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक), साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ (युवकांसमोरील आव्हाने) हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. ‘ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे १६ वे शिबीर आहे.

अधिक माहितीसाठी एड.स्वप्नील तोंडे (९९२३५२३२५४) तेजस भालेराव (९१७२४८७०१९),सचिन पांडुळे (९०९६३१३०२२) यांच्याशी संपर्क साधता येईल.शिबिरासाठी दोनशे रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यात शिबिरस्थळी नाश्ता,चहा आणि भोजनाचा समावेश आहे .स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे युवक युवती आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना प्रवेश शुल्क ऐच्छिक आहे.

समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावर आधारित हे शिबिर आयोजित केले गेले आहे.या शिबिरात सत्य,अहिंसा,सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबन यासारख्या गांधीजींच्या महत्त्वपूर्ण तत्त्वांवर सखोल चर्चा होईल.गांधीवादी विचारसरणी आजच्या जगातदेखील कशी उपयुक्त ठरू शकते, यावर प्रकाश टाकला जाईल, त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *