पोलिसात तक्रार दाखल, पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण
पुणे : एका प्रसिद्ध दैनिकाच्या पत्रकाराने अतिक्रमांची बातमी प्रसिद्ध केली. अतिक्रमणाची बातमी प्रसिद्ध केल्याने एका पेपर विक्रेत्यांनी पत्रकाराला फोनवरून अश्लील शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, याप्रकरणी पेपर विक्रेत्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. नितीन शिंदे (रा. दर्गा वसाहत, खडकी) असे पेपर विक्रेत्याचे नाव आहे
प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील एका प्रसिद्ध दैनिकात पत्रकार अमोल सहारे काम करतात. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मीनाक्षी लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. या कारवाईची बातमी सहारे यांनी आपल्या प्रसिद्ध दैनिकात प्रकाशित केली. बातमी प्रकाशित झाल्यावर पेपर विक्रेता नितीन शिंदे यांनी ऑफिसमध्ये फोन करून अश्लील भाषेत सहारे यांच्या विषयी बदनामी केली तसेच ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणून माफी मागण्यास भाग पाडले. अधिकार्यांनी कॉन्फरन्स कॉल वर पेपर विक्रेता नितीन शिंदे यांच्याशी सहारे यांच्याशी बोलणी करून दिले, त्यावेळी नितीन शिंदे यांनी अमोल सहारे यांच्या प्रचंड अश्लील शिवीगाळ केली तसेच हात पाय तोडून जिवे मारण्याची थेट धमकी दिली. फोन वरून धमकी दिल्याने संपूर्ण संभाषण सहारे यांच्या फोन मध्ये रेकॉर्डिंग झाली आहे. फोनवरून अश्लील शिवीगाळ तसेव जीवे मारण्याच्या धमकी मुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
फोन वरून अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने पत्रकार अमोल सहारे यांनी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, तसेच पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस आयुक्त सहित वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी यांना निवेदनाद्वारे कळविले. पत्रकार सहारे यांच्या निवेदनाची दाखल घेत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये नितीन शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत स्पष्टीकरणासाठी नितीन शिंदे यांची संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाही