राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आल्यावर एक वर्षात महाराष्ट्र – गोवा महामार्ग तयार होईल – गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Spread the love

पुणे, प्रतिनिधी –
महाराष्ट्र ते गोवा दरम्यानचा महामार्ग रस्ता मध्ये काही कंत्राटदार चांगले मिळाले नाही तसेच महाराष्ट्र मध्ये मध्यंतरी सरकार बदलले गेल्याने हा रस्ता निर्माण करण्यात अडचणी निर्माण झाल्या. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आता याबाबत पुढाकार घेतला असून राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आल्यावर एक वर्षात हा मार्ग पूर्ण होईल असे मत गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, बाळासाहेब हरपळे, राहुल कुलकर्णी उपस्थित होते.
सावंत म्हणाले,महाराष्ट्र मध्ये पुन्हा महायुती सरकार सत्तेत आले पाहिजे. गोवा मध्ये रस्ते,रेल्वे आणि विमानतळ याचा मागील दहा वर्षात कायापालट झाला आहे. महाराष्ट्र हा विकसित महाराष्ट्र करण्यासाठी महायुती सरकार राज्यात पुन्हा आले पाहिजे. सन २०१४ मध्ये राज्यातील जनतेने भाजपला बहुमत दिले. २०१९ मध्ये देखील जनतेने युतीला साथ दिली . पण उध्दव ठाकरे यांच्या स्वार्थमुळे वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सोबत भाजप राज्यात चांगल्या प्रकारे काम करत आहे. मराठी भाषा मध्ये माझे शिक्षण झाले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काँग्रेसकडून कधी दिला गेला नाही पण भाजपच्या केंद्र सरकारने आता त्याला दर्जा दिला आहे ही महाराष्ट्रसाठी गौरवाची बाब आहे. युवा शक्ती, महिला शक्ति, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार मुद्द्यावर सरकारच्या सर्व योजना राबवल्या जात आहे. गृह आधार योजना अंतर्गत आम्ही ११ वर्ष महिलांना दर महिना १५०० रुपये मदत दिली आहे. पण कर्नाटकने अशी घोषणा निवडणूकवेळी केली पण काँग्रेसने त्याची अंमलबजावणी केली नाही. शेतकरी आत्महत्या होत असताना त्यांना आधार देण्यासाठी शेतकरी सन्मान योजना, कृषी पंप वीज माफी , पीक विमा दिली गेला आहे. काँग्रेसने देशात गरीबी हटाव योजना आणली पण गरीबी ते कधीच दूर करू शकले नाही. काँग्रेसने महाराष्ट्र मध्ये ६० वर्ष राज्य केले त्यांनी त्यांच्या किती पायाभूत सुविधा निर्माण झाल्या सांगाव्यात पण मागील दहा वर्षात मोदी सरकारने महाराष्ट्र मध्ये अनेक विकासकामे राबवली आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतसाठी जनतेने महायुतीला साथ द्यावी. काँगेस नेते राहुल गांधी कोणतेही बिनबुडाचे आरोप सातत्याने आदिवासी समाजाबद्दल करत असतात. आदिवासी यांचा सन्मान करण्याचे काम भाजपने प्रथम केले. काँग्रेसला ६० वर्षात बिरसा मुंडा कधी आठवले नाही पण भाजपने त्यांची राष्ट्रीय स्तरावर जयंती सुरू केली. समान नागरी कायदा हा सन १९६४ पासून गोवा राज्यात राबवला जात आहे आणि सर्व समाज योग्यप्रकारे राहत आहे. मालमत्ता ही लग्ना नंतर पुरुष आणि महिला यांच्यात समान वाटप होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *