कोथरूड गावठाण गुजरात कॉलनीत चंद्रकांतदादांना उत्स्फूर्त प्रतिसाद!

Spread the love

 

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचाही सहभाग

कोथरुडकरांचा एकच वादा चंद्रकांतदादा पाटील घोषणांनी गावठाण दणाणले

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचा जाहीर पाठिंबा

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोथरूड गावठाण, गुजरात कॉलनी, भेलकेनगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील रॅलीत सहभागी झाले होते. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेनेही चंद्रकांत पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दिला.

विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसच बाकी आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आज कोथरूड गावठाण, भेलकेनगर, गुजरात कॉलनी भागातून बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करुन पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील गणेश मंदिरातील आरतीने झाली. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेनेही आपला जाहीर पाठिंबा चंद्रकांतदादा पाटील यांना जाहीर केला. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बादल सिंह ठाकुर यांनी पाठिंब्याचे पत्र चंद्रकांतदादा पाटील यांना दिले.

यावेळी कर्नाटक मधील मेंगलोर विधानसभा मतदारसंघातील आमदार हरिश पुंजा, भाजप कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, हर्षाली माथवड, ॲड. वासंती जाधव, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस दुष्यंत मोहोळ, भाजपा नेते शाम देशपांडे, प्रभाग १२ चे अध्यक्ष अंबादास अष्टेकर, रिपाइंचे अध्यक्ष वसंतराव ओव्हाळ सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *