दादा तुम्ही आम्हाला आमच्यातलेच जास्त वाटता! – सिद्धार्थ पॉलेसमधील पदाधिकाऱ्यांची भावना

Spread the love

सोसायटी संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दादा, तुमच्यातला कार्यकर्ता आणि साधेपणा आम्हाला खूप भावतो. अशी भावना कोथरूड मधील सिद्धार्थ पॉलेसमधील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील आपल्या प्रचारार्थ आज कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत.

आज त्यांनी कोथरुड मधील जोशी म्युझियम परिसरातील सिद्धार्थ पॅलेसमधील नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, भाजपा नेते प्रशांत हरसुले प्रभाग क्रमांक १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, प्रतिक खर्डेकर, विनिता काळे उपस्थित होते.

यावेळी सोसायटीचे पादाधिकारी कोल्हटकर म्हणाले की, “दादा, तुम्ही महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून मोठे आहातच; पण या मंत्रीपदापेक्षा तुमच्यातला कार्यकर्ता आणि साधेपणा आम्हाला खूप भावतो.” त्यावर चंद्रकांतदादा पाटील यांनीही नम्रपणे क‌तज्ञता व्यक्त केली.

यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी ४० टक्के कर सवलती मुळे सर्व पुणेकरांना दिलासा मिळाला असल्याची माहिती दिली. तसेच, मेट्रो सारख्या प्रकल्पामुळे कोथरुड मधील नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे, अशी भावना व्यक्त केली. तसेच, कोथरूडकरांच्या सेवेसाठी सदैव समर्पित असल्याची भावना ही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *