आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते ! – सुराज्य अभियान

Spread the love

 

सर्वांनी मतदान करा !

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर या दिवशी राज्यात सार्वत्रिक मतदान होणार आहे. या निमित्ताने सर्व जनतेने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे; मात्र एकूणच बहुतांश जनतेचा मतदानातील कमी होत जाणारा सहभाग, तर दुसरीकडे काही धर्मांध शक्तीकडून होत असलेल्या ‘व्होट जिहाद’ हा चिंतेचा विषय आहे. आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते. यासाठी राज्यातील समस्त जनतेने प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, तसेच महाराष्ट्राची संस्कृती, सुरक्षितता आणि समृद्धी यांना प्राधान्य देणार्‍याला मतदान करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी सामाजिक माध्यमांवर ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने #VoteForSurajya असे आवाहन करून राज्यभरात जनतेमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *