महाराष्ट्र ख्रिस्ती संघा तर्फे बोपोडीत नाताळचा सण जल्लोषात साजरा

Spread the love

बोपोडी : दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी महाराष्ट्र ख्रिस्ती संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आणि संघाचे अध्यक्ष सुरेशभाऊ ससाणे यांनी विविध पक्ष, संघटना, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना एकाच विचारपीठावर आणून नाताळचे औचित्य साधून प्रभू  येशूच्या आगमनाचे स्वागत करून सामाजिक चळवळीचा भाग म्हणून जेष्ठ पत्रकार अमोल सहारे यांच्या पत्नी ऍड. पूजा सहारे यांना माजी नगरसेवक आनंदजी छाजेड यांच्या हस्ते गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आदर्श पत्रकार म्हणून सम्राट चे दत्ता सूर्यवंशी यांचा देखील या वेळी सन्मान करण्यात आला. प्रभू येशू यांचे स्वागत गुणगान विजय जाधव यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस वसुधाताई नीरभवणे, डॉ. विजय ढोबळे, अंथोनी आय, ऍड. सुनील केदारी, मा. उपमहापौर सुनीताताई वाडेकर, रीना ससाणे, मा. नगरसेवक ऍड. नंदलाल धिवार, निलेश वाघमारे, ज्योतीताई परदेशी, सुंदरताई ओव्हाळ, राजेंद्र भुतडा, अनिल भिसे, विशाल जाधव, विकी ढोणे, सादिकभाई शेख, ऍड. विठ्ठल आरुडे, पत्रकार मंगेश गायकवाड, रफिकभाई कुरेशी, विजय जगताप, बाबा तांबोळी, राजन निर्भवणे, अमित केंगार, पिंटू  रुपटक्के, रुपेश पिल्ले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *