207 व्या शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे जाणाऱ्या भिम सैनिकांचे बोपोडी सिग्नल चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास संस्था,स्वराज्य प्रतिष्ठान, आनंद छाजेड हेल्पलाइन ग्रुप, वनवर्धिनी फाऊंडेशन,फुले-शाहू – आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ व अल्पोपहार पाणी बॉटल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तसेच माजी नगरसेवक आनंदजी छाजेड यांच्या दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्षम नगरसेवक प्रकाशभाऊ ढोरे,माजी नगरसेवक आनंदजी छाजेड,संजय भाऊ कांबळे,विजयभाऊ जाधव, सौ.अंकिता विजय ढोणे व सहकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल ओव्हाळ,संतोष खरात, अकबर शेख, संगीता कांबळे, प्रितम भालेराव,लखन साळुंखे,अक्षय घोडके यांनी परिश्रम घेतले…