भगवान गौतम बुद्धांची जयंती न्यू बोपोडी सोशल कट्टा परिवाराकडून साजरी

Spread the love

बोपोडी, पुणे :
पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी येथील न्यू बोपोडी सोशल कट्टा परिवाराच्या वतीने महाकरूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध वंदना व खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बोपोडी सिग्नल चौकाजवळील बोधी वृक्षाखाली हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रकाशभाऊ ढोरे (मा. नगरसेवक), मा. आनंदजी छाजेड (मा. नगरसेवक), मा. तेजिंदरसिंग अहलुवालिया (आरपीआय नेते) आणि मा. करीमलाला शेख (स्वीकृत नगरसेवक) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

प्रमुख उपस्थितीत मा. भिमराव सोनवणे (आरपीआय नेते), मा. मोहनराव म्हस्के (अध्यक्ष, बहुजन भिमसेना), मा. तुषार मोहिते (युवा नेते), मा. अनिल गायकवाड (उद्योजक) व मा. विजय ढोणे (युवा नेते) यांचा समावेश होता.
खीर वाटप : शशिकांत आओव्हाळ, मंगेश गायकवाड. अँड. योगीराज पिल्ले, सचिन कांबळे तन्मय गंवाडे आदींनी केले.

बौद्ध वंदना आणि प्रवचनासाठी बौध्दाचार्य आयु. विनोद यादव आणि आयु. उमेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून तथागत बुद्धांना अभिवादन केले.

कार्यक्रमाचे संयोजन मा. अंकुशराव साठे (संस्थापक अध्यक्ष, न्यू बोपोडी सोशल कट्टा) व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तमरित्या पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *